शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

तर मनपा घेणार नाही घरातील कचरा! आयुक्तांचे फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 8:35 PM

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना शिस्त लावण्यासाठी घरातूनच विलगीकृत स्वरूपात कचरा देण्याचे फर्मान काढले आहे.

ठळक मुद्देविलग स्वरूपातच कचरा द्या;  शिस्त लावण्यासाठी नागरिकांना तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कर भरला नाही तर जेलची हवा खावी लागेल, अशी तंबी दिल्यानंतर आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना शिस्त लावण्यासाठी घरातूनच विलगीकृत स्वरूपात कचरा देण्याचे फर्मान काढले आहे. वारंवार सूचना देऊनही जर नागरिक अशाप्रकारे कचरा देत नसतील तर त्यांच्या घरातील कचरा महापालिका उचलणार नाही. अशी तंबी त्यांनी नागरिकांना दिली आहे.स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरने सहभाग घेतल्यानंतर महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. निर्मिती स्थळावरूनच कचरा ओला आणि सुका अशाप्रकारे देण्यात यावा. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच स्वयंसेवी संस्थाही नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. यासाठी घरात ओला आणि सुका कचरा एकत्रित करण्यासाठी दोन स्वतंत्र कचरापेटी ठेवा, असे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, त्यानतंरही नागरिकांच्या सवयी बदललेल्या नाहीत.आयुक्तांनी या बाबीची गंभीर दखल घेतली आहे. गुरुवारी त्यांनी यासंदर्भात फर्मानच जारी केले आहे. यापुढे प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात दोन स्वतंत्र कचरापेटी ठेवाव्यात. ओला आणि सुका कचरा विलग करूनच स्वच्छतादूताकडे देण्यात यावा. जो व्यक्ती असे करणार नाही त्यांच्यावर यापुढे नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील दुकानदार, पानठेले, हॉकर्स, ठेलेधारक तसेच अन्य आस्थापनांनीही आपल्या दुकानांसमोर दोन स्वतंत्र कचरापेट्या ठेवणे बंधनकारक आहे. दुकानातून निघणारा कचरा विलग स्वरूपातच कचरापेट्यांमध्ये टाकावा आणि आजूबाजूच्या परिसरात कचरा होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.ओला आणि सुका कचरापेटीत काय टाकाल?भाजीपाला, फळे, अन्नपदार्थ, खराब झालेले शिळे अन्न, अंड्यांची टरफले, मासे, कोंबडीची हाडे, सडलेली फळे, चहापावडर, पत्रावळ्या, झाडांच्या कोवळ्या फांद्या, पाने, फुले, पुष्पहार, गवत इत्यादी कचरा ओल्या कचऱ्यामध्ये मोडतो.सुका कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू, बाटली, शीट्स, बॉक्सेस, पॅकिंग मटेरियल, रॅपर, दूध-दह्याचे पॅकेट्स, वर्तमानपत्र, वह्या, निमंत्रण पत्रिका, पिज्झा, मिठाईचे रिकामे बॉक्स, वाट्या, प्लेटस, चमचे, थर्माकोल, स्पंज, डस्टर, सिरॅमिक कप, बशा, लाकूड, केस, नारळाच्या करवंट्या इत्यादी .

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न