लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धर्मादाय आयुक्तांकडे स्वयंसेवी संस्था म्हणून कुठलीही नोंदणी नसल्याच्या मुद्यावरुन वाद निर्माण झाला होता. काही जणांनी यावर प्रश्न उपस्थित करत याच नावाने स्वत:च्या संस्थेची नोंदणी करण्यासाठी अर्जदेखील केले. संघाकडून या वादावर मौन बाळगण्यात आले होते. अखेर खुद्द सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या मुद्यावर संघाची भूमिका मांडली. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी संघ नोंदणीकृत संस्था का नाही व संघाचा आर्थिक ताळेबंद कसा चालतो, याचे उत्तर दिले.संघाची स्थापना १९२५ साली झाली. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता व आपले कायदे नव्हते. त्यामुळे संघाने नोंदणी केली नाही. स्वातंत्र्यानंतर संघकार्याचा आणखी विस्तार होत गेला. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक संघटनेने नोंदणी केलीच पाहिजे असा कुठलाही कायदा झाला नाही. मात्र कायदेशीररीत्या संघाचा एक दर्जा आहे. ‘बॉडी आॅफ इन्डिव्हिज्युअल’ हा संघाचा दर्जा असून त्या आधारावर आमचे काम सुरू आहे. या दर्जामुळे आम्हाला कर लागत नाही. त्यामुळे सरकार आम्हाला हिशेब मागत नाही. मात्र कुणीही आमच्यावर दोषारोप करू नये याची काळजी आम्ही घेतली आहे. आम्ही दरवर्षी ‘आॅडिट’ करतो. प्रत्येक आर्थिक ‘युनिट’चे नियमित बाहेरील ‘चार्टर्ड अकाऊंटंट’च्या माध्यमातून ‘आॅडिट’ करण्यात येते. ही बाब आम्ही खूप गंभीरतेने घेतो. जर सरकारने कधी हिशेब मागितला तर आम्ही लगेच तो सादर करु, असे सरसंघचालकांनी स्पष्ट सांगितले. बँकखात्यांच्या माध्यमातून आमचे आर्थिक व्यवहार चालतात. पैशाचे बेहिशेबी व्यवहार आम्ही कधीच करत नाहीत, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.उल्लेखनीय आहे की जनार्दन मून यांनी संघाच्या नोंदणीवर प्रश्न उपस्थित केले होते व धर्मादाय आयुक्त कार्यालयात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या नावाने संस्थेच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. या संस्थेचा प्रथम वर्धापनदिन मागील महिन्यातच पार पडला.
...म्हणून संघ नोंदणीकृत संस्था नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:23 AM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धर्मादाय आयुक्तांकडे स्वयंसेवी संस्था म्हणून कुठलीही नोंदणी नसल्याच्या मुद्यावरुन वाद निर्माण झाला होता. काही जणांनी यावर प्रश्न उपस्थित करत याच नावाने स्वत:च्या संस्थेची नोंदणी करण्यासाठी अर्जदेखील केले. संघाकडून या वादावर मौन बाळगण्यात आले होते. अखेर खुद्द सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या मुद्यावर संघाची भूमिका मांडली. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी संघ नोंदणीकृत संस्था का नाही व संघाचा आर्थिक ताळेबंद कसा चालतो, याचे उत्तर दिले.
ठळक मुद्देसरसंघचालकांची स्पष्टोक्ती : नियमानुसार होते ‘आॅडिट’, प्रत्येक पैशाचा असतो हिशेब