शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 7:38 AM

पंतप्रधान मोदींचा सवाल : विराेधक गरिबांची प्रगती पाहू शकत नाहीत

योगेश पांडे/जितेंद्र ढवळेलोकमत न्यूज नेटवर्ककन्हान (जि. नागपूर) : एनडीएला देशात चारशे जागा मिळाल्या तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात येईल, असा अपप्रचार कॉंग्रेस व विरोधकांकडून केला जात आहे. मात्र ६० वर्षे कॉंग्रेसने आंबेडकरांनी दिलेले संविधान समानपणे लागू का केले नाही, असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. रामटेक मतदारसंघातील कन्हान येथे बुधवारी आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

कन्हानमधील ब्रुक बाँड मैदानात आयोजित या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री व भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

मी राजकारणात आलो तेव्हापासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी संविधानाचाच मुद्दा आणला. यातूनच त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येत आहे. हे लोक गरिबांची प्रगती पाहू शकत नाहीत. आणीबाणीच्या वेळी देशातील लोकशाही धोक्यात आली नव्हती का आणि गरीबाचा मुलगा सत्तेत आल्यावरच त्यांना संविधानावर संकट आले असल्याचे दिसले का असा सवाल त्यांनी केला. 

विरोधकांना शक्ती मिळाली तर देशाला खंडित करतीलइंडी आघाडीवाले पूर्ण ताकदीने देशातील लोकांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता एकजूट झाली तर त्यांचे राजकारण संपेल, याची त्यांना जाण आहे. विरोधकांना शक्ती मिळाली, तर ते देशाला खंडित करतील. विरोधक सनातनवर हल्ला करत असून, हिंदू धर्माच्या शक्तीला समाप्त करू इच्छितात, असा आरोप पंतप्रधानांनी केला.

कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपविलेस्वातंत्र्यानंतर काँग्रेसने षडयंत्र करून सातत्याने एससी, एसटी, ओबीसी समाजाला विकासापासून दूर ठेवले. अगदी बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारणदेखील संपविले व त्यांना भारतरत्नपासून वंचित ठेवले. विरोधक सीएएचा विरोध करत आहेत. कारण, याचे सर्वांत मोठे लाभार्थी बौद्ध, दलित आहेत, असा दावा पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांनी पूर्ण ऐकले गडकरी, मुख्यमंत्र्यांचे भाषणसर्वसाधारणत: पंतप्रधानांच्या सभेमध्ये त्यांचे आगमन झाल्यावर स्वागत झाल्यानंतर थेट त्यांच्या भाषणाला सुरुवात होते. मात्र कन्हानच्या सभेत पंतप्रधानांनी नितीन गडकरी व मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण ऐकले व त्यानंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली. यामुळे मंचावरील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

काय म्हणाले मोदी...n१९ एप्रिलला तुम्हाला केवळ खासदार निवडायचा नाही; तर पुढील हजार वर्षांच्या भारताचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. nजेव्हा विरोधक मला किंवा माझ्या आई-वडिलांना शिवीगाळ करतात, तेव्हा आमचे सरकार येणार हे समजून घ्या.nरालोआ सरकारने सर्वाधिक ओबीसी मंत्री देशाला दिले.nकाँग्रेसने जाणूनबुजून संपूर्ण देशात बाबासाहेबांचे संविधान लागू होऊ दिले नव्हते.nकाश्मीरमधून कलम ३७० हटल्यानंतर तेथील एससी, एसटी यांना हक्क मिळाले.nरामायण व बुद्धिस्ट सर्किटमुळे पर्यटनाचा विस्तार होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाnagpurनागपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४