लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरूआहे. परंतु अजूनही अपवाद वगळता जलाशयांची स्थिती चांगली नाही. गोसेखुर्द प्रकल्प १०० टक्के भरला. परंतु तोतलाडोहमध्ये अजूनही अत्यल्प साठा आहे. त्यात केवळ ११ टक्के साठा आहे. उर्वरित प्रकल्पांचीही अशीच अवस्था असून बहुतांश जलाशये अजूनही कोरडी आहेत. एकूण प्रकल्पांचा विचार केला तर आजच्या घडीला मोठ्या प्रकल्पात केवळ २८ टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठ्याची क्षमता ही २९६४.४ दलघमी इतकी आहे.जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २६ आॅगस्ट रोजी या मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ८१६ दलघमी इतका म्हणजे केवळ २८ टक्के पाणीसाठा आहे. या १८ पैकी केवळ कामठी खैरी (५२ टक्के), लोवर नांद (८५ टक्के), वडगाव (७६ टक्के), दिना (५२ टक्के), पोथरा ५१ टक्के, आणि गोसेखुर्द १०० टक्के भरले आहेत. उर्वरित १२ प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे.तोतलाडोह प्रकल्पात केवळ ११ टक्के, रामटेक २१ टक्के, इटियाडोह २९ टक्के, सिरपूर ४ टक्के, पुजारीटोला ३ टक्के, कालिसरार ६ टक्के, असोलामेंढा ३३ टक्के, बोर ३० टक्के, धाम ४६ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ (२७ टक्के)आणि धापेवाडा बॅरेज टप्पा १ (३२ टक्के) इतका पाणीसाठा आहे.मध्यम प्रकल्पांची स्थितीही भयावह आहे. नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठ्याची क्षमता ही ५३७.५८ दलघमी इतकी आहे. आजच्या तारखेत (२६ आॅगस्ट) केवळ १७६.४८ दलघमी म्हणजेच ३३ टक्के इतका पाणीसाठा आहे.
- तर यंदा जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:16 AM
आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरूआहे. परंतु अजूनही अपवाद वगळता जलाशयांची स्थिती चांगली नाही.
ठळक मुद्देगोसेखुर्द भरले, तोतलाडोहमध्ये अत्यल्प साठा : मोठ्या प्रकल्पात २८ टक्के, मध्यम प्रकल्पात केवळ ३३ टक्के साठा