फेसबुक, इन्स्टाग्रामची वाढली आवड : अल्पवयीनांच्या अपहरणाने खुलासा
जगदीश जोशी
नागपूर : सोशल मीडियाची अत्याधिक आवड अल्पवयीन यांचे आयुष्य नेस्तनाबूत करीत आहे. फेसबुक अथवा इन्स्टाग्रामवर फ्रेंडशिपच्या आवडीमुळे अल्पवयीन शारीरिक शोषण आणि नशाखोरीच्या तावडीत सापडत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींची संख्या जास्त आहेत. अनेक प्रकरणे तर पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. अशाच प्रकारच्या एका प्रकरणाने गेल्या आठवड्यात कोराडी पोलिसांची झोप उडविली होती.
कोराडी परिसरात ९ आणि १२ वर्षांच्या दोन मुली राहतात. दोन्ही गरीब कुटुंबातील आहेत. १२ वर्षीय अल्पवयीनची एका युवकाशी फेसबुकवर मैत्री झाली. मुलगी नेहमीच मोबाईलवर असल्याचे पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला. कथित बॉयफ्रेंडसोबत संपर्क न झाल्याने मुलीने नवीन युक्ती शोधली. तिने शेजारच्या नऊ वर्षीय मुलीचा नंबर दिला. बॉयफ्रेंड नऊवर्षीय मुलीचा फेसबुक आयडी अथवा मोबाईलवर संपर्क करून १२ वर्षीय मुलीसोबत बातचीत करू लागला. हा घटनाक्रम अनेक दिवस सुरू होता. नऊ वर्षीय मुलीच्या वडिलांना मुलगी नेहमीच मोबाईलवर व्यस्त राहत असल्याचा संशय आला. मुलीवर नजर ठेवल्यानंतर त्यांना मुलगी आणि तिच्या शेजारच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंड संदर्भात माहिती मिळाली. त्यांनी आपली मुलगी आणि शेजारच्या मुलीच्या आईला फटकारले. त्यानंतर मुलींनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. रात्री संधी पाहून दोघीही पळून गेल्या. रात्रीची वेळ आणि लॉकडाऊन असल्याने दोघींनाही पळण्यासाठी कुठलेही साधन मिळाले नाही. त्यात रात्रभर कोराडीच्या निर्जन परिसरात बसून राहिल्या. सकाळ झाल्यानंतर दोघींनी ओळखीच्या युवकांना फोन करून बाईक घेऊन बोलविले. त्यांच्यासोबत बाईकवर फिरू लागल्या. यादरम्यान दोघींचे कुटुंबीय कोराडी ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवून मोबाईल लोकेशनची तपासणी सुरू केली. चौकशीत त्यांना दोघी बाईकस्वार युवकांसोबत गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हिसका दाखविताच दोन्ही युवक अल्पवयीनसोबत परत आले. त्यांनी अल्पवयीन घरून पळून आल्याची माहिती असल्याचा इन्कार केला. दोघींनी ही गोष्ट लपविल्याचे कबूल केले. त्यांनी युवकांना स्वत:च बोलविण्याचे सांगितले. जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी युवकांना सोडले आणि अल्पवयीनांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविले.
दररोज येताहेत अनेक प्रकरणे
लॉकडाऊनमुळे पालक आणि मुले घरात कैद आहेत. अभ्यास आणि गेम्स खेळण्याच्या बहाण्याने मुले पालकांकडून मोबाईल घेतात आणि सोशल मीडियाच्या संपर्कात येतात. येथे नवनवीन मित्र बनतात. जे प्रलोभन देऊन चुकीच्या मार्गावर घेऊन जातात. मध्यम आणि निम्म मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले मोठ्या संख्येने याला बळी पडत आहेत. अशी प्रकरणे पोलिसांकडे दररोज येतात. बदनामीच्या भीतीने अधिकांश पालक तक्रार करीत नाहीत.