महापौर : कार्यवाहीचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने शहरात ७५ वंदेमातरम् हेल्थ पोस्ट सुरू करण्यात येत आहे. यासाठी जागा, वीज, पाणी ही व्यवस्था मनपा करेल. देखरेख, डॉक्टर्स आणि औषधांची व्यवस्था संस्थांनी करणे अपेक्षित आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी आढावा बैठकीत केले. उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, आरोग्य सभापती महेश महाजन उपस्थित होते.
वंदेमातरम् हेल्थ पोस्ट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी ९३ जागांची नावे आली आहेत. त्यातील १० हेल्थ पोस्ट जागा अंतिम करण्यात आल्या आहेत, त्याचे प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले.