रामटेक: सामाजिक दायित्व समजून समाजसेवा करणे हाच खरा लोकधर्म असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. शिक्षकदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आदर्श शिक्षकांसह कोरोना योद्धा, डॉक्टर, पत्रकार, परिचारिका, अधिकाऱ्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसोहळा कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता. तीत कुंभेजकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्णा अगस्ती, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, तहसीलदार बाळासाहेब मस्के, नगराध्यक्ष दिलीप देशमुख,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आशिष तेजे, गटशिक्षण अधिकारी संगीता तभाने, मौद्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार खराबे, पोलीस उप निरीक्षक विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद राऊत, न.प.उपाध्यक्ष आलोक मानकर, तुलाराम मेंढे, डाॅ. विष्णूपंत किंमतकर, ॲड. महेंद्र येरपूडे, किट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, डाॅ. ओंकार चौधरी याप्रसंगी उपस्थित होते.
विद्यार्थी आणि समाजहितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन चौकसे यांनी दिले. मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील २०० गुणवंत विद्यार्थी व १०० उपक्रमशील शिक्षकांचा यावेळी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रशांत येडके यांनी केले. संचालन प्रा.योगिता गायकवाड, स्नेहा खांडेकर, रूपल शास्त्री, शीतल चिंचोळकर , निकिता अंबादे यांनी केले. आभार राकेश मर्जिवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश शेंडे, प्रशांत येडके, प्रशांत ढोमणे, शैलेश रोषनखेडे, दिलीप घोडमारे, रविना श्यामकुळे, सुषमा मर्जिवे, शीतल चिंचोळकर, निकिता अंबादे, सचिन चव्हाण, प्रशांत जांभूळकर, देवानंद कामठे, रुपाली तांडेकर, नंदिनी राऊत आदींनी सहकार्य केले. ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.