लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निर्मल नगरीचे रहिवासी प्रमोद मानमोडे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. प्रफुल्ल करपे यांनी स्थापन केलेली ‘निर्मल नगरी कंडोनियम’ ही सोसायटी बोगस आणि वैयक्तिक स्वार्थासाठी तयार केली असून सहकार विभागाकडे नोंद नाही. सोसायटीच्या नावाखाली बनावट रसीदद्वारे बळजबरीने वसूल करण्यात येणारी वर्गणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचा आरोप नगरीतील रहिवासी प्रफुल्ल मनोहर शेंडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.शेंडे म्हणाले, बोगस सोसायटीला रहिवाशांचा विरोध आहे. सोसायटीची माहिती २० डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकारी आणि सहकार निबंधकांना लेखी पत्राद्वारे कळविली आहे. सोसायटीचे अध्यक्ष प्रफुल्ल नामदेवराव करपे बोगस रसीद फाडून बळजबरीने रहिवाशांना सोपवून वसुली करीत आहेत. स्वयंघोषित कंडोनियमला आम्ही पूर्वीही नाकारले आहे. या सोसायटीने निर्मल नगरीत दबावाचे वातावरण निर्माण केले आहे. विनाकारण तणाव आणि रहिवाशांची दिशाभूल करीत आहेत. बहिष्कार टाकण्याच्या धमक्या सोसायटीची माणसे देत असल्याचा आरोप शेंडे यांनी केला.निर्मल नगरीच्या व्यवस्थापनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. येथील रहिवाशांचे मेंटनन्सचे जमा असलेले पैसे आमचा विरोध असलेल्या सोसायटीला परत करायचे असतील तर त्यांना न देता निर्मल नगरीतील रहिवाशांना वैयक्तिक स्वरुपात द्यावे, अशी मागणी शेंडे यांनी केली. येथील रहिवाशांची फ्लॅट, रो-हाऊसेस, बंगला व गाळेधारक अशी वेगळी हाऊसिंग सोसायटी तयार करून पैसे द्यावेत, असे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेत गीता शेंडे, माधुरी मोरे, उषा इंगळे, शोभा सोळंखी, केशर प्रचंड, शीतल भांडारकर, कृष्णा उगले, नितेश इंगळे आणि अनेक रहिवासी उपस्थित होते.
करपेंनी स्थापन केलेली सोसायटी बोगस : बळजबरीने वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:20 AM
निर्मल नगरीचे रहिवासी प्रमोद मानमोडे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. प्रफुल्ल करपे यांनी स्थापन केलेली ‘निर्मल नगरी कंडोनियम’ ही सोसायटी बोगस आणि वैयक्तिक स्वार्थासाठी तयार केली असून सहकार विभागाकडे नोंद नाही. सोसायटीच्या नावाखाली बनावट रसीदद्वारे बळजबरीने वसूल करण्यात येणारी वर्गणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचा आरोप नगरीतील रहिवासी प्रफुल्ल मनोहर शेंडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.
ठळक मुद्देनिर्मल नगरीचे रहिवासी मानमोडेंच्या समर्थनार्थ