ऑनलाईन लोकमत नागपूर : देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी विविध समाजांमध्ये संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी एकत्र येऊन इंडिया फॉर डायव्हर्सिटी (आयएफडी) हे अभियान सुरू केले आहे.हॉर्वर्ड विद्यापीठाचे संशोधक व या अभियानाचे प्रमुख डॉ. सूरज येंगडे हे शनिवारी नागपुरात आले होते. नागपुरातही त्यांनी विविध सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांशी यासंबंधात संवाद साधला. दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. येंगडे यांनी सांगितले, आपल्या देशात खूप विविधता आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ग आदींबाबत विविधता आहे. या विविधतेतून भेदभाव निर्माण झाला आहे. तो अमूक धर्माचा. तो अमूक जातीचा अशी विभागणी झाली आहे. त्यांच्यातील संवादही बंद झालेले आहेत. त्यांच्या एकमेकांबद्दल ज्या भावना आहेत, त्या केवळ ऐकीव आहेत. त्यातून अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. या प्रत्येकाची राष्ट्राबद्दलची कल्पनाही वेगवेगळी आहे. प्रत्येक वर्ग, प्रत्येक धर्म राष्ट्राला आपल्या नजरेने पाहतो त्यामुळे देशभक्तीबद्दल प्रत्येकाचे स्वत:चे विचार आहेत. एका धर्माचे विचार दुसऱ्या धर्मातील लोक वेगळ्या नजरेने पाहतात. हे केवळ एकमेकांशी संवाद नसल्याने होत आहे. त्यामुळे समाजात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. त्यात एकवाक्यता नाही. ही एकवाक्यता संविधानाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. म्हणून इंडिया फॉर डायव्हर्सिटी हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. आपली विविधता कायम ठेवून एकमेकांशी संवाद व्हावा आणि एकमेकांबद्दल असलेला द्वेष प्रेमाने दूर करावा, हा याचा मुख्य उद्देश आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती आवश्यकआयआयटी मुंबई येथून या अभियानाची सुरुवात झालेली आहे. नांदेड व इतर काही शहरांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. सुरुवातीला देशातील ८ राज्यांमधील १६ शहरांमध्ये पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. या अभियानांतर्गत विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यात येत असला तरी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी संवादावर अधिक भर दिला जात आहे. कारण येणाऱ्या समाजाचे व देशाचे नेतृत्व ते करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक जागृती होणे आवश्यक आहे, असेही डॉ. येंगडे यांनी सांगितले.
देशातील समाज वैचारिकदृष्ट्या जखमी : डॉ. सूरज येंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:20 PM
देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे.
ठळक मुद्देइंडिया फॉर डायव्हर्सिटी : विविध समाजात संवाद घडविण्याचा प्रयत्न