लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी ७५ टक्के जलस्रोत उन्हामुळे कोरडे पडतात. यामुळे वन्यजीवांचे हाल होतात.वन्यजीवांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी २४ तासांची पर्यायी व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच जंगलात सौर उर्जेवर चालणारे बोअरवेल लावले जात आहेत. या वेळी वन विभाग मोठ्या संख्येने असे बोअरवेल उभारणार आहेत....२४ तास पाण्याची व्यवस्थावनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथून २४ तास वॉटर होलमधून पाणी टपकत राहील. त्यातून वन्यजीव आपली तहान भागवू शकतील. सध्या वनविभागाने जंगलात तयार केलेल्या वॉटर होलमध्ये बोअरवेलमधून पाणी पडते. मात्र ते बोअरवेल हाताने हलवावे लागतात. त्यामुळे वॉटर होलमध्ये पाणी पूर्ण वेळ राहात नाही....असुविधा दूर होणारजंगलात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम वॉटर होलमध्ये हँडपंपाच्या मदतीने कर्मचारी पाणी भरत असत. मात्र हे काम सुविधाजनक नव्हते. धोकादायकही तेवढेच होते. अनेकदा तर मनुष्यबळाअभावी वॉटर होल भरले जात नसायचे. पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडत असत. सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल हा या समस्येवर उत्तम उपाय ठरणार आहेत. यामुळे वॉटर होलमध्ये नेहमी पाणी उपलब्ध राहील, असा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे....
तहानलेल्या वन्यजीवांसाठी जंगलात सौरऊर्जेवरचे बोअरवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:03 PM
उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे.
ठळक मुद्देअसुविधा होणार दूर : दरवर्षी आटतात ७५ टक्के जलस्रोत