शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

भूखंड विकून वृद्धास फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:09 AM

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे वृद्ध व्यक्तीच्या भूखंडाची विक्री करणाऱ्याच्या विरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींमध्ये विधित प्रदीप ...

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे वृद्ध व्यक्तीच्या भूखंडाची विक्री करणाऱ्याच्या विरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींमध्ये विधित प्रदीप पारसेकर (३६, रा. बजाजनगर), नरेश ज्ञानेश्वर सावरकर (५५, रा. पार्वतीनगर), रूपम बाबूराव मुळक (४४, रा. सुरेंद्रगड) व यांचा एक साथीदार आहे. गोपालनगर निवासी ८५ वर्षीय गजानन दुपारे यांचा भामटी येथील लोकसेवानगरमध्ये भूखंड आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे एक डमी व्यक्ती उभा केला आणि भूखंडाची विक्री केली. प्रकरणाची माहिती होताच दुपारे यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

------------------------

टिप्पर-ट्रकमध्ये धडक, क्लिनरचा मृत्यू

नागपूर : ट्रक आणि टिप्परच्या धडकेत क्लिनरचा मृत्यू झाला असून, ट्रक चालक जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री १ वाजता छत्रपती चौकात घडली. मृत नरपेश हिंमत यादव (२४) तर जखमी विक्रम यादव (२४) दोन्ही राहणारे दतिया, मध्य प्रदेशचे आहेत. विक्रम ट्रक चालक तर नरपेश क्लिनर आहे. दोघेही ट्रकमध्ये पाईप घेऊन ग्वाल्हेर येथून विजयवाडाकडे चालले होते. रात्री १ वाजता छत्रपती चौक पार करताना ट्रकची धडक रेतीने भरलेल्या टिप्पर क्रमांक एम.एच. ४०, ए.के. ७२२२ला लागली. धडक लागताच ट्रक जवळच असलेल्या इमारतीच्या गोदामात शिरला. ट्रकचे केबिन पूर्णत: उद्ध्व‌स्त झाले असून, क्लिनर नरपेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालक विक्रम जखमी झाला आहे. प्रतापनगर पोलिसांनी टिप्पर चालकाचा ताब्यात घेतले आहे.