शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने विकले १०० वर कट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 10:56 AM

कोलमाफिया शेख हाजी बाबा याच्या इशाऱ्यावर शस्त्रांची तस्करी करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा संजय खरे याने पाच वर्षांत १०० पेक्षा अधिक कट्टे विकल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देशेख हाजी शस्त्र तस्करी प्रकरण

जगदीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोलमाफिया शेख हाजी बाबा याच्या इशाऱ्यावर शस्त्रांची तस्करी करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा संजय खरे याने पाच वर्षांत १०० पेक्षा अधिक कट्टे विकल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षांत हाजी आणि संजयने महाराष्ट्रासह शेजारी राज्यांतील गुन्हेगारांनाही शस्त्रे विकली आहेत. याची माहिती होताच एटीएस संजय आणि हाजीची पूर्ण कुंडली काढण्याच्या कामाला लागले आहे.एटीएसने या टोळीचा पर्दाफाश करीत घुग्गुस (चंद्रपूर) येथील कोलमाफिया गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर, संजय खरे आणि बिहार येथील सुपत सिंग याला अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन कट्टे आणि २० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शस्त्र तस्करीच्या या टोळीचा मुख्य सूत्रधार हाजी आहे. त्याच्या इशाऱ्यावरच संजय खरे बिहारच्या मुंगेर जमालपूर येथून कट्टे व काडतुसे आणत होता. ते हाजीसह इतरांना उपलब्ध करून देत होता. हाजी ७ फेब्रुवारीपर्यंत एटीएसच्या ताब्यात आहे तर संजय खरेला मंगळवारी न्यायालयीन कोठडींतर्गत तुरुंगात पाठविण्यात आले. सूत्रानुसार हाजी आणि संजय मागील पाच वर्षांपासून शस्त्रांची तस्करी करीत आहेत. संजयचे बिहारमध्ये मजबूत नेटवर्क आहे. तो जमालपूरमधील उत्तम कट्टे बनविणाऱ्यांशी जुळलेला आहे. यामुळे त्याने आणलेली शस्त्रे विकत घेणारे मोठ्या प्रमाणावर असतात. संजय पाच वर्षांपूर्वीसुद्धा कट्ट्यासह सापडला होता. त्यावेळी संजय शस्त्राची ‘डिलिव्हरी’ द्यायला जात होता. यापूर्वीच तत्कालीन आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर संजयने आपली कामाची पद्धत बदलविली. तो भरवशाच्या लोकांनाच शस्त्राची डिलिव्हरी देत होता. हाजी आणि संजयने शहर आणि ग्रामीण भागातील अनेक गुन्हेगारांना कट्टा आणि काडतुसे विकली आहेत. ग्रामीण भागात सक्रिय कोल तस्करीशी जुळलेले अनेक गँगस्टर्सला हाजीचे संरक्षण आहे. एटीएसने संजयकडून शहरात आणि ग्रामीण भागात पसरलेल्या नेटवर्कबाबत बरीच विचारपूस केली. परंतु तो शस्त्राच्या तस्करीबाबत काहीही सांगायला तयार नाही. हाजीनेसुद्धा अशीच भूमिका घेतली आहे.गुप्तचर संस्थाही सक्रियशस्त्र तस्करी समोर आल्यानंतर गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत. ते आरोपीची कसून चौकशी करीत आहे. शस्त्र तस्करासह त्यांचे इतर प्रकरणातील लिंकबाबतही तपासणी केली जात आहे. आरोपींनी यातून बरीच संपत्ती जमविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी