दोन वेळा चौकशी प्रश्नांचा भडिमार चौकशीचा धिटाईने सामनानरेश डोंगरे नागपूरलाखो पालकांच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या आणि क्षणाक्षणाला त्यांच्या मनातील भीती गडद करणाऱ्या अपहरण कांडाच्या सूत्रधाराने पोलीस अधिकाऱ्यांना एकदा नव्हे तर चक्क दोनदा मामा बनविले. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी अत्यंत धिटाईने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीला सामोरे गेला. विविध प्रश्नांना उत्तरे देऊन आरोपी प्रदीप निनावे याने सराईत गुन्हेगारांनाही मागे टाकले. फोनने बळावला निनावेवर संशयनागपूर : शुक्रवारी रात्री चैतन्य सुखरूप हाती लागल्यानंतर या अपहरणकांडाचा घटनाक्रम आरोपींनी पोलिसांना सांगितला. तो ऐकून ज्या प्रदीप निनावेची आपण दिवसभरात दोनवेळा चौकशी केली आणि कोणताही संशय न घेता सोडून दिले, तो निनावेच या अपहरणकांडाचा सूत्रधार आहे, हे वास्तव कळल्यानंतर काही वेळासाठी पोलीस अधिकारी चक्रावून गेले.मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने राज्यभर खळबळ निर्माण झाली होती. नागपुरात अलीकडे कुश कटारिया, यश बोरकर आणि युग चांडक या मुलांचे अपहरण झाले आणि अपहरणकर्त्यांनी या तिघांची निर्घृण हत्या केल्याच्या थरारक स्मृती नागपूरकरांच्या मनावर ओरखडे काढणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे चैतन्यच्या अपहरणामुळे लाखो पालकांच्या हृदयाची धडधड वाढली होती. १८ ते २० तास होऊनही चैतन्य अथवा त्याच्या अपहरणकर्त्यांची कसलीही माहिती मिळत नसल्याने लाखो अस्वस्थ पालकांच्या मनातील भीती गडद होत होती. दुसरीकडे पोलीस चैतन्यचा शोध लावण्यासाठी गुरुवार दुपारपासून शहर पोलीस दलातील अधिकारी खास करून पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे आणि गुन्हेशाखेचे अधिकारी कर्मचारी अविश्रांत काम करीत होते.आष्टनकर कुटुंबीयांकडून त्यांचे नातेवाईक, ओळखीचे, व्यवहार झालेले, नियमित संपर्कात असलेल्यांची माहिती विचारली जात होती. पोलिसांच्या शेकडो प्रश्नांनी आष्टनकर परिवाराचीही चिडचिड वाढली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रत्येक माणसावर पोलिसांनी नजर रोखली होती. सुभाष आष्टनकर यांनी बोलता बोलता प्रदीप निनावेचे नाव सांगितले. प्रत्येक वेळी सुखदु:खात तो सहभागी असल्याचीही माहिती दिली. यावेळी मात्र तो आला नसल्याचे सांगितले. पोलिसांना ही बाब खटकली. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. लागलीच शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास गुन्हेशाखेच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रदीप निनावेला गाठले. (प्रतिनिधी)त्याला गुन्हेशाखेत आणले. तब्बल तासभर विचारपूस केली. त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. किरकोळ प्रकृतीच्या निनावेने थंड डोक्याने पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘ये वो नही हो सकता’ , असे पुटपुटत पोलीस अधिकाऱ्यांनी निनावेला घरी पाठवले. या प्रकारानंतर काही वेळाने खंडणीसाठी फोन आल्याचे कळताच दुपारी ४ वाजता एका अधिकाऱ्याला निनावेचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा त्याच्या घरून उचलून आणले. याहीवेळी निनावेने सराईत गुन्हेगारासारखे पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. त्याची चौकशी केल्यानंतर ‘फालतू समय बरबाद किया’ , असे पुटपुटत पोलिसांनी निनावेला घरी पाठवले. चैतन्यसोबत हाती लागलेला मुख्य आरोपी ईशाकने जेव्हा या अपहरणकांडाचा सूत्रधार प्रदीप निनावे आहे, असे सांगितले तेव्हा पोलीस अक्षरश: चक्रावले. --ईशाकने केले मुंडणमास्टर मार्इंड प्रदीप निनावेप्रमाणेच मुख्य आरोपी ईशाकही कमालीचा धूर्त आहे. अपहरण केल्यानंतर ओळखले जाऊ नये म्हणून ईशाकने दोन दिवसांपूर्वीच मुंडण केले. अपहरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर प्रत्येक तासाने तो मनीषनगरातील हालहवाल जाणून घेत होता. खंडणीबाबत प्रदीपसोबत त्याची निरंतर बोलणी सुरू होती. अपहरणानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने अनेक बनावट नावाने सीमकार्ड खरेदी करून ठेवले होते. खंडणी मागण्याचा फोन करण्यासाठी तो खास खाप्यातून कामठीला आला होता. फोन केल्यानंतर सीमकार्ड काढून तो खाप्याला परतला. पोलिसांना कामठीचे लोकेशन कळेल आणि ते तेथेच घुटमळतील, असा त्याचा कयास होता. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याचे घरच गाठले नाही तर त्याची मानगूटही पकडली.
सूत्रधाराची बनवाबनवी
By admin | Published: January 10, 2016 3:21 AM