‘लोकमत मिशन अॅडमिशन एक्सपो’ : उपराजधानीतील पालकांचा उदंड प्रतिसाद नागपूर : मुलांचे शिक्षण, शाळेची निवड याला घेऊन पालकांमध्ये मोठी चिंता असते. परंतु ‘लोकमत’ व ‘सेंट पॉल स्कूल’, हुडकेश्वरच्यावतीने आयोजित ‘लोकमत मिशन अॅडमिशन एक्सपो’मुळे पालकांची ही चिंता दूर झाली आहे. झाशी राणी चौक येथील रामगोपाल माहेश्वरी भवनात आयोजित या ‘एक्सपो’ मधून पालकांना एकाच छताखाली विविध शाळा व शैक्षणिक संस्थांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शुक्रवारी या प्रदर्शनाला सुरुवात होताच पालकांची गर्दी उसळली. ‘गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल’ हे या एक्सपोचे प्रमुख सहयोगी आहेत. तीन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. ‘एक्सपो’चे उद्घाटन सेंट पॉल स्कूल, हुडकेश्वरचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शबी चौरसिया, नायर एसेंस इंटरनॅशनल स्कूलचे संचालक विजय मेनन, मेजर हेमंत जकाते स्कूलचे मधुसूदन मुडे, नायर एसेंसचे रवी शास्त्री व लोकमतचे ग्रुप इव्हेंट व्यवस्थापक नितीन नौकरकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उपस्थित पालकांनी शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी थेट संपर्क साधत माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळलेल्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘अॅक्टीव्हीटी’ आधारित शिक्षण गायकवाड पाटील समूहाच्या गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल, वर्धा रोड येथे नर्सरीपासून ते वर्ग सहावीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे सीबीएसई अभ्यासक्रमासोबतच भोजनाची सोय उपलब्ध आहे. शाळेची इमारत आधुनिक पद्धतीची आहे. २५ एकर जागेवर हिरवेगार मैदान आहे. विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयींच्या मदतीने शिक्षण दिले जाते. येथे विज्ञान पार्कही उपलब्ध आहे. संस्थेच्या संस्थापकांनी या संस्थेला अभ्यासासोबतच ‘अॅक्टीव्हीटी’वर आधारीत शिक्षण केंद्राच्या रुपात सामोर आणले आहे. यात अभ्यास आणि खेळांवर पन्नास-पन्नास टक्के लक्ष दिले जाते. सर्वच वर्गांमध्ये ‘आॅडिओ-व्हिज्युअल’ची सोय आहे. वातानुकूलित बसची व्यवस्या असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. नायर एसेंसमध्ये मुलांवर आधारित शिक्षण नायर एसेंस इंटरनॅशनल स्कूल, गजानन महाराज मंदिर जवळ, हिंगणा-अमरावती बायपास रोडवर नागलवाडी येथे स्थित आहे. येथील शिक्षण हे उच्चस्तरीय विचारांवर आधारित आहे. ज्या अंतर्गत येथील शिक्षण बालमित्र आणि मुलांवर आधारित ठेवण्यात आले आहे. येथे मुलांना विविध ‘अॅक्टीव्हीटी’च्या माध्यमातून अनुभव, वास्तविक आणि संमेलनाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. येथील वातावरण धर्म आणि लिंग निरपेक्ष आहे. विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण व योग्य शिक्षकांची मोठी संख्या आहे. येथे पाचस्तरीय ‘लर्निंग मेथड’ आत्मसात करण्यात आली आहे. ‘स्मार्टकिड्ज’मध्ये लहान मुलांकडे विशेष लक्ष स्मार्टकिड्ज प्ले स्कूल (आयएसओ ९००१ : २००८ प्रमाणित) विशेष रुपाने लहान मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. यात मुलांची कोमलता, त्यांचे बालपण आणि मानसिकतेला लक्षात घेऊन सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही शाळा बजेरिया येथील मसोबा मंदिर जवळ आहे. शाळेत मुलांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची मोठी संख्या असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते. विविध रंगात रंगलेले वर्ग आहेत. येथे अद्ययावत तंत्रांचा वापर करून शिकविले जाते. स्मार्टकिड्जमध्ये केवळ प्लेग्रुप, नर्सरी, स्मार्ट ज्युनिअर आणि स्मार्ट सीनिअर वर्ग आहेत. येथे मासिक हप्त्याने शुल्क भरण्याचीही व्यवस्था आहे. ‘सेफ्टी बँड’द्वारे मुलांची सुरक्षा यूरोकिड्स प्री-किड्स हे एक इंटरनॅशनल ब्रॅण्ड आहे, यात नागपुरातील ‘उन्हारियाज यूरोकिड्स प्री-स्कूल’च्या रुपात सुरू करण्यात आली आहे. ही शाळा वर्धमाननगर येथील स्वामीनारायण शाळेजवळ स्थित आहे. संचालक सुनीता उन्हारिया आणि प्रियंका उन्हारिया आहेत. यांनी सांगितले, १.८ ते ३ वर्षांच्या मुलांना प्लेग्रुपमध्ये, अडीच ते चार वर्षांपर्यंतच्या मुलांना नर्सरीमध्ये, साडेतीन ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना युरो ज्युनिअर आणि साडेचार ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांना युरो सिनिअरमध्ये प्रवेश दिला जात आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हाताला ‘सेफ्टी बॅण्ड’ बांधला जातो. ज्यामुळे आई-वडिलांना त्यांच्या मोबाईलवर मुलांची माहिती मिळते. संस्थेद्वारे समरकॅम्पचे आयोजन २१ एप्रिलपासून करण्यात आले आहे. सेंट पॉल स्कूलची विशेष शिक्षण प्रणाली हुडकेश्वर येथील सेंट पॉल स्कूलमध्ये विशेष शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जातो. या शिवाय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि क्रीडाकडे विशेष लक्ष दिले जाते. यामुळे मुलांचा मेंदू तल्लख होऊन अभ्यासात प्रगती होते. येथे सीबीएसई व राज्य बोर्ड हे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहे. शाळेजवळ एक एकर परिसरात पसरलेले क्रीडा मैदान आहे. येथे ११० खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची बसण्याची पर्याप्त व्यवस्था आहे. सोबत संगणक कक्ष, प्रयोगशाळा, फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, इंग्लिश, मराठी, जिओग्राफी, सोशिओलॉजी आदींच्या स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. क्रीडामध्ये ‘इनडोअर’ व ‘आऊटडोर’ सोबतच ‘अॅथ्लेटिक्स अॅण्ड स्केटिंग’, स्पेशल कोचिंगची सोय उपलब्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकविले जाते.
शाळा प्रवेशासाठी एकाच छताखाली समाधान
By admin | Published: February 18, 2017 2:43 AM