शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

जनतेचे प्रश्न सोडवा, तरच काँग्रेस बळकट होईल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाला मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावे, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाला मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहन पक्षाच्या स्थापना दिनी करण्यात आले. तसेच नागपूर काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी निमित्त पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक वरिष्ठ काँग्रेसींच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करतील, असा निर्णयसुद्धा यावेळी घेण्यात आला.

काँग्रेसचा स्थापना दिनानिमत्त शहर व ग्रामीण काँग्रेस कार्यालयात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शहर काँग्रेसतर्फे महाकाळ सभागृहात तर ग्रामीण काँग्रेसतर्फे ग्रामीणच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना पद देतो. नागरिकांच्या समस्या सोडवल्या तरच पक्ष मजबूत होईल. पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट समजून घेतली आणि कामाला लागले तर पुढचा महापौर काँग्रेसचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाकाळकर सभाागृहात आयोजित या कार्यक्रमात किशोर गजभिये, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोढे, अतुल कोटेचा, हुकुमचंद आमदरे, नगरसेवक संजय महाकालकर, प्रशात धवड, संदीप सहारे, रश्मी धुर्वे, बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, इरशाद अली, किशोर पाटील, अ‍ॅड. नंदा पराते, घनश्याम मांगे आदी उपस्थित होते. संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. तर सुनील पाटील याांनी आभार मानले.

ग्रामीणतर्फे गणेशपेठ येथील जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात केक कापून पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. काँग्रेस ही एक शक्ती आहे. ही शक्ती सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी वारण्याचे आवाहन माजी मंत्री व ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केले. तर, काँग्रेस हा एक विचार असून या विचाराने नेहमीच देशाला बळकटी दिली असल्याचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांनी सांगितले. यावेळी किशोर गजभिये , एस.क्यू. जामा, राहुल सिरिया, राहुल घरडे , उदयसिंग यादव, कुंदा राऊत, कामठीचे नगराध्यक्ष शहाजहां शफाअत अहमद, वसंत गाडगे, दुधराम सव्वालाखे, कैलास राऊत, सुनीता ठाकरे, वंदना बालपांडे, रमेश जोध, दामोधर धोपटे, अहफाज अहमद, जयंत दळवी, रमेश दुबे, मतीन खान, मुस्ताक अहमद, कला ठाकरे, प्रियंका निकोसे, मंदा चिमनकर, केतन रेवतकर, रितेश राऊत, सुरय्या बेगम आदी उपस्थित हाेते.

---