नागपूर : जळगाव आणि भुसावळ विभागात नॉन इंटरलॉकींगचे काम आणि थर्ड व फोर्थ लाइनच्या कामामुळे नागपूर विभागातून धावणाऱ्या १४ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून सात रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ३ डिसेंबरला ०११३९ नागपूर- मडगाव एक्स्प्रेस, ४ डिसेंबरला १२११४ नागपूर- पुणे एक्स्प्रेस, २२१३७ नागपूर- अहमदाबाद एक्स्प्रेस, १२१०५ मुंबई- गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस आणि ०११४० मडगाव- नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
५ डिसेंबरला १२१३६ नागपूर- पुणे एक्स्प्रेस, १२११३ पुणे- नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस, १२१४० नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, १२१३९ मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, २२१३८ अहमदाबाद- नागपूर एक्स्प्रेस, ११०३९ कोल्हापूर- गोंदिया एक्स्प्रेस, ११०४० गोंदिया- कोल्हापूर एक्स्प्रेस, १२१०६ गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि ६ डिसेंबरला १२१३५ पुणे- नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
'या' रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल
- २२९४० बिलासपूर- हापा एक्स्प्रेस ५ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- संत हिरदाराम नगर- रतलाम- छायापुरी या मार्गाने धावणार
- १२८३४ हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- रतलाम- भोपाळ- छायापुरी या मार्गाने धावणार
- १२६५६ चेन्नई सेंट्रल- अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस ४ व ५ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- रतलाम- भोपाळ- छायापुरी या मार्गाने धावणार
- २०८१९ पुरी- ओखा द्वारका एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- भोपाळ- रतलाम- छायापुरी या मार्गाने धावणार
- २२८२७ पुरी- सुरत एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- संत हिरदारामनगर- रतलाम- वडोदरा या मार्गाने धावणार
- १२९९४ पुरी- गांधीधाम एक्स्प्रेस ५ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- भोपाळ- रतलाम- छायापुरी या मार्गाने धावणार
- १२९५० संत्रागाछी- पोरबंदर कवीगुरु एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा- भुसावळ- खंडवा- इटारसी- भोपाळ- रतलाम- छायापुरी या मार्गाने धावणार