शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:40 IST

देशाच्या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी स्वत:च्या पक्षाची नाराजी ओढवून घेणारे सोमनाथ चटर्जी यांची ओळख ‘हेडमास्टर’ अशी झाली होती. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सोमनाथदा’ यांचे नागपूरशीदेखील ऋणानुबंध होते.

ठळक मुद्देनागपूरने अनुभवला स्पष्ट वक्ता जनप्रतिनिधी मनपाने केला होता सत्कार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी स्वत:च्या पक्षाची नाराजी ओढवून घेणारे सोमनाथ चटर्जी यांची ओळख ‘हेडमास्टर’ अशी झाली होती. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सोमनाथदा’ यांचे नागपूरशीदेखील ऋणानुबंध होते. ए.बी.बर्धन यांच्या कार्ययज्ञाने घडलेल्या डाव्या चळवळीच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. विशेष म्हणजे सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याअगोदर त्यांच्या मनातील संवेदनशीलता अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळाली होती. नागपूरच्या भूमीवरून त्यांनी शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय कलंक असे म्हणत हा मुद्दा संसदेत उचलून धरण्याचे सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले होते.लोकसभा अध्यक्षपद भूषवत असताना सोमनाथ चटर्जी नागपुरात आले होते. १८ फेब्रुवारी २००८ रोजी सोमनाथ चटर्जी यांचे शहरात विविध ठिकाणी चार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान, मनपाने त्यांचा नागरी सत्कारदेखील केला होता. मात्र तो दिवस गाजला होता तो सर्वार्थाने शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी राजकीय पक्षांवर ओढलेल्या आसूडाने. देशात प्रगतीचे दावे होत असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ही शरमेचीच बाब आहे. या आत्महत्यांचा राष्ट्रीय प्रश्न म्हणून विचार करण्याची वेळ आली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले मतभेद बाजूला सारून संसदेत या विषयावर निरपेक्षा चर्चा करावी, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले होते. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातून शेतकऱ्यांबद्दलची त्यांची आत्मीयता व चिंता स्पष्टपणे दिसून येत होती, अशी आठवण डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

प्रसारमाध्यमांनादेखील केला हितोपदेशटिळक पत्रकार भवनात नागपूर श्रमिक पत्रकार भवनातर्फे ‘मीट द प्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसमवेत शहरातील गणमान्य नागरिकांशीदेखील संवाद साधला होता. संसद किंवा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याचे स्वातंत्र्य प्रसारमाध्यमांना आहे. मात्र चांगल्या निर्णयांना तसेच समाजातील सकारात्मक बाबींनादेखील बातम्यांत स्थान द्यायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला होता. ‘स्टींग आॅपरेशन्स’वर बंदीची त्या काळी मागणी होत होती. मात्र यावर बंदी घालण्यापेक्षा बंधने असावीत असे त्यांनी सुचविले होते. ‘पेज ३’ संस्कृतीला त्यांचा अगोदरपासूनच विरोध होता व या कार्यक्रमातूनदेखील त्यांनी याचा पुनरुच्चार केला होता.

न्यायपालिकेतील भ्रष्टाचारावर सडेतोड भाष्यसोमनाथ चटर्जी यांनी स्पष्टवक्ता नेता म्हणून ओळख होती. आपल्या मनातील भाव ते थेट बोलून मोकळे होते. नागपुरातील वकिलांनादेखील याचा अनुभव आला होता. हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे आयोजित अ‍ॅड.एन.एल.बेलेकर स्मृती व्याख्यानमालेत बोलताना माजी मुख्य न्यायमूर्ती एस.पी.भरुचा यांच्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत चिंता व्यक्त केली होती. सरकारने कशाप्रकार कार्य करावे याबाबत न्यायालयांकडून भाष्य अभिप्रेत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.

डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांशी जिव्हाळापश्चिम बंगाल ही सोमनाथ चटर्जी यांची कर्मभूमी राहिली असली तरी नागपुरशीदेखील त्यांचे विशेष ऋणानुबंध होते. डाव्या चळवळीच्या काही मोठ्या कार्यकर्त्यांची भेट घ्यायला ते काही वेळा नागपुरात आले होते. ए.बी.बर्धन ‘सीपीआय’चे राष्ट्रीय सरचिटणीस असताना सोमनाथ चटर्जी अनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेत. शहरातील अनेक जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे जवळचे संबंध होते.

टॅग्स :Somnath Chatterjeeसोमनाथ चॅटर्जी