शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

पाय दाबण्यास नकार दिला, मुलाने वडिलांचाच खून केला

By दयानंद पाईकराव | Published: August 18, 2024 5:31 PM

विकृत मुलाला अटक : सहा महिन्यापूर्वी आला होता तुरुंगाबाहेर, अनेक गुन्हे आहेत दाखल

नागपूर: वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्यामुळे कुख्यात गुन्हेगार असलेल्या मुलाने वडिलांना शिविगाळ करीत त्यांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर, बरगड्यांवर व नाकावर हाताबुक्क्यांनी व लाथेने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे ६२ वर्षाच्या वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण अपार्टमेंट नवाबपुरा येथे शनिवारी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० दरम्यान घडली असून कोतवाली पोलिसांनी आरोपी मुलाला गजाआड केले आहे.

कुशल उर्फ इंगा दत्तात्रय शेंडे (३३, रा. फ्लॅट नं. १ करण अपार्टमेंट नवाबपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. तर दत्तात्रय बाळकृष्ण शेंडे (६२) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय हे आपला मोठा मुलगा प्रणव (३५), आरोपी लहान मुलगा कुशल उर्फ इंगा आणि भावाचा मुलगा चैतन्य उर्फ गणु अनिल शेंडे (२३) यांच्यासोबत राहत होते. शनिवारी आरोपी इंगाने वडिल दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. परंतु वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिला. त्यामुळे विकृत मनोवृत्ती असलेल्या आरोपी इंगाला राग आला. त्याने वडिलांना शिविगाळ केली. त्यानंतर त्याने वडिलांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर, बरगडीवर, नाकावर हाताबुक्यांनी व लाथांनी मारून त्यांना गंभीर जखमी केले.

आरोपी इंगाचा मोठा भाऊ प्रणव व चुलतभाऊ चैतन्य उर्फ गणु यांनी जखमी अवस्थेतील दत्तात्रय यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी दत्तात्रय यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा काशीद यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरून रक्ताचे नमुने गोळा करून आरोपी इंगाला ताब्यात घेतले. प्रणव शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी इंगा विरुद्ध कलम १०३ (१), ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.आरोपी इंगाविरुद्ध अनेक गुन्हे दाखलआरोपी कुशल उर्फ इंगा हा कुख्यात गुन्हेगार आहे. सहा महिन्यांपूर्वी तो तुरुंगातून सुटून आला आहे. त्याच्या विरुद्ध एमपीडीए, खंडणी मागणे, आर्म्स अॅक्ट, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो विकृत स्वभावाचा आहे. या विकृत स्वभावामुळे त्याने आपल्या वृद्ध वडिलांचाच खून केला. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी