लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेक बाऊन्सप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या वेगवेगळ्या तीन आदेशानुसार ‘फार्मासिस्ट टाइम्स’ साप्ताहिकाचा मालक आरोपी अजय बद्रीनारायण सोनी याला ६ आॅक्टोबर २०१७ पर्यंत एकूण २१ लाख ६० हजार १० रुपये उच्च न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात जमा करावे लागणार आहेत.अमरावतीच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाच्या तीन आदेशांविरुद्ध सोनीने उच्च न्यायालयात तीन वेगवेगळे पुनर्विचार अर्ज दाखल केले होते. या अर्जांवरील सुनावणीदरम्यान सोनीने आपले वकील अॅड. पी. एस. तिवारी यांच्यामार्फत ६ आॅक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची हमी दिल्याने, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या एकलपीठाने २२ सप्टेंबर रोजी तीन वेगवेगळे आदेश दिले होते. त्यापैकी पहिल्या आदेशानुसार सोनीला ७ लाख ३२ हजार, दुसºया आदेशानुसार ९ लाख ४५ हजार ५०० आणि तिसºया आदेशानुसार ४ लाख ८२ हजार ५१० रुपये उच्च न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात ६ आॅक्टोबरपर्यंत जमा करावे लागणार आहे. अमरावतीच्या मुधोळकरपेठ येथील डॉ. अल्का राजपुरिया यांनी आरोपी अजय सोनीविरुद्ध चेक बाऊन्सप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या कलम १३८ अन्वये तीन प्रकरणे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाºयाच्या विशेष न्यायालयामध्ये दाखल केली होती. या तिन्ही प्रकरणांवर १ डिसेंबर २०१६ रोजी न्यायालयाने डॉ. राजपुरिया यांच्या बाजूने वेगवेगळे निकाल दिले होते.सोनीने तिन्ही निकालांविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता, ११ सप्टेंबर २०१७ रोजी ते न्यायालयाने फेटाळून लावले होते. उच्च न्यायालयात सोनीच्या पुनर्विचार अर्जांवर १० आॅक्टोबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे.
सोनीला हायकोर्टात जमा करावे लागणार २१.६० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:35 AM
चेक बाऊन्सप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या वेगवेगळ्या तीन आदेशानुसार ‘फार्मासिस्ट टाइम्स’ साप्ताहिकाचा मालक आरोपी अजय बद्रीनारायण सोनी याला .....
ठळक मुद्देचेक बाऊन्स प्रकरण :१० आॅक्टोबरला पुढील सुनावणी