लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेनाच्या दुसऱ्या टप्प्यातील संक्रमणाने रामटेक, पारशिवनी व माैदा तालुक्यात कहर केला हाेता. एकीकडे रुग्णसंख्येत वाढ हाेत हाेती, तर दुसरीकडे शासकीय दवाखान्यांमध्ये काेराेनासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडाही निर्माण झाला हाेता. त्यामुळे गरीब रुग्णांचे हाल झाले. आता संक्रमण कमी हाेत असताना, आराेग्य विभागाने ग्रामीण भागातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये औषधांचा मुबलक पुरवठा केला आहे, अशी माहिती जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ.दीपक सेलाेकर यांनी दिली.
रामटेक तालुक्यात मॅक्सक्लव या अँटिबायाेटिकच्या १,४४,९०० गाेळ्या, पारशिवनी तालुक्यात १,७६,३०० गाेळ्या व माैदा तालुक्यात १,२७,९०० गाेळ्या उपलब्ध करण्यात असून, रामटेक तालुक्याला व्हिटॅमिन सीच्या २५,६८०, पारशिवनीला ३०,३०० तर माैदा तालुक्याला १३,००० गाेळ्या, रामटेक तालुक्याला डाॅक्सियसायक्लीनच्या १९,९००, पारशिवनीला १३,६०० व माैदा तालुक्याला ८,००० गाेळ्या, रामटेक तालुक्याला प्लेन पॅरासिटामाेलच्या २,१९,१०० गाेळ्या, पारशिवनीला १,५६,९७० गाेळ्या व माैदा तालुक्याला १,१७,१०० गाेळ्या, रामटेक तालुक्याला सीरप पॅरासिटामाेलच्या ३,२५८ गाेळ्या, पारशिवनीला २,३१० व माैद्याला २,५६० गाेळ्या, रामटेक तालुक्याला फॅव्हीपिराविर कंटेटटी फेबीफ्यूच्या २,८९०, पारशिवनीला ३,२१० व माैदा तालुक्याला २,२२० गाेळ्या देण्यात आल्याचे डाॅ.दीपक सेलाेकर यांनी सांगितले.
...
लसीकरण किट उपलब्ध
रामटेक, पारशिवनी व माैदा तालुक्याला काेराेना प्रतिबंधक लसीकरण किटही देण्यात आल्या आहेत. रामटेक तालुक्यातील २१,६८२ नागरिकांनी पहिला तर ४,८४६ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला. पारशिवनी तालुक्यात २५,४३० नागरिकांनी पहिला ५,७५९ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला. माैदा तालुक्यात ३०,९४२ नागरिकांनी पहिला व ४,१९३ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे.
...
काेविड केअर सेंटरची तयार
शासनाच्या निर्देशानुसार, काेराेना रुग्णांना गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिलमध्ये गृहविलगीकरणात असलेल्या रामटेक तालुक्यातील २,६६५, पारशिवनीमधील ३,२०९ व माैदा तालुक्यातील १,८८७ रुग्णांची सहा मिनीट वाॅक स्टेट करण्यात आली. तारसा (ता.माैदा) प्राथमिक आराेग्य केंद्रात आराेग्य विभाग व पृथ्वीराज फाउंडेशनच्या सहकार्याने काेविड केअर सेंटर सुरू करण्याची तयार केली जात आहे.