लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढली आणि सोकावलेले गुन्हेगारही मोकाट सुटले. परिणामी अवघ्या महिनाभरात नागपुरात गुन्ह्याचा आलेख पावणेदोन पटीने वाढला आहे. एप्रिलमध्ये उपराजधानीत एकूण २१८ गुन्हे घडले होते. मे महिन्यात एकूण ३९१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, हाणामारी या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागपुरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. १२ मार्चनंतर लॉकडाऊन सुरू झाले अन्नागरिकांना घरी बसण्याची वेळ आली. एप्रिल महिन्यात नागरिक घरात आणि पोलीस २४ तास रस्त्यावर अशी स्थिती होती. त्यामुळे गुन्हेगारी पुरती पूर्णपणे थंडावली होती. मात्र, लॉकडाऊन शिथिल करताच गुन्हेगारी उफाळून आली आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामाऱ्या आधी घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. एप्रिल २०२० मध्ये एकूण २१८ गुन्हे घडले होते तर मे महिन्यात त्यापेक्षा १२३ गुन्हे जास्त (एकूण ३९१) घडले आहेत. यावरून एकाच महिन्यात गुन्हेगारांनी कसे डोके वर काढले त्याची प्रचिती यावी.एप्रिल २०२०खून ४, खुनाचा प्रयत्न ३, दुखापत ४८, जबरी चोरी १, दरोडा ०, घरफोडी २२, चोºया ७०, वाहन चोरी ३९, बलात्कार ५, विनयभंग १०, (महिला अत्याचार १५), हल्ला ५, फसवणूक १३, अपहरण ७मे २०२०खून ७, खुनाचा प्रयत्न ७, दुखापत १००, जबरी चोरी २, दरोडा ३, घरफोडी ३४, चोºया ८१, वाहनचोरी ४८, बलात्कार ९, विनयभंग १९ (महिला अत्याचार २८), हल्ले ६, फसवणूक २५, अपहरण १६गुन्हे घटले ‘पण’...!१ जानेवारी ते ३१ मे २०१९एकूण गुन्हे : ३,३४२१ जानेवारी ते ३१ मे २०२०एकूण गुन्हे : २,३६९नागपूर शहरात सध्या गुन्हेगारी उफाळून आल्याचे दिसत असले तरी उपरोक्त आकडेवारीवरून गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपुरातील गुन्हेगारी २९ टक्के कमी असल्याचेही दिसून येते.मोकाट गुन्हेगारच कारणीभूतउपराजधानीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यास नुकतेच कारागृहातून बाहेर पडलेले आणि मोकाट सुटलेले गुन्हेगारच कारणीभूत आहेत.
लॉकडाऊन शिथिल होताच नागपुरात वाढली गुन्हेगारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 7:57 PM