ऑनलाईन लोकमत नागपूर : ऋतुचक्रावर आधारित यंदाच्या कालिदास महोत्सवाची सांगताही मोठ्या थाटात झाली. पंडित सतीश व्यास आणि सूरमणी पंडित रेणू मजुमदार यांनी सादर केलेल्या संतूर व बासरीच्या बहारदार जुगलबंदीने नागपूरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संतूर व बासरीच्या जुगलबंदीसाठी रविवारी नागपूरकर रसिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. जागतिक स्तरावरील विख्यात असलेल्या या कलावंतांनी त्यांना निराश केले नाही. व्यास यांचे कलमांवरील प्रभुत्व, सुरेल वादन तर रोणू मजुमदार यांचे मधाळ बासरीवादन यासह राग यमनच्या वादनात रसिक हरवून गेले होते.यानंतर ओडिशी नृत्य बिंदू जुनेजा आणि त्यांचा ग्रुपने सादर केले. शास्त्रीय गायनाची जुगलबंदी ऋतुरंग पंडित संजीव अभ्यंकर व अश्विनी भिडे-देशपांडे यांनी सादर केली.कविवर्य सुरेश भट सभागृह उभारल्याचे सार्थक झाले - नितीन गडकरीकालिदास समारोहाला रसिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ‘कविवर्य सुरेश भट सभागृह उभारले त्याचे सार्थक झाले’, अशी भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.या कलावंतांचे आणि त्यांच्या साथीदारांचे नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी स्वागत केले.कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महापालिका यांच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कालिदास समारोहाची रविवारी सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते. कालिदास समारोहाच्या आयोजनाबद्दल गडकरी यांनी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांचे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम’चे कौतुक केले.यावेळी गडकरी यांच्या हस्ते क्रिएशन आॅफसेटचे तरुण उद्योजक स्वप्निल पंचभाई व श्वेता पंचभाई, आकांक्षा अग्रवाल, संदीप बारस्कर, जहिर भाई, शुभांगी गाडेकर, निवेदक जैनेंद्र सिंह व रेणुका देशकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. विभागीय आयुक्त यांनी प्रास्ताविक केले.
संतूर व बासरीच्या जुगलबंदीने श्रोते मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:54 AM
ऑनलाईन लोकमत नागपूर : ऋतुचक्रावर आधारित यंदाच्या कालिदास महोत्सवाची सांगताही मोठ्या थाटात झाली. पंडित सतीश व्यास आणि सूरमणी पंडित रेणू मजुमदार यांनी सादर केलेल्या संतूर व बासरीच्या बहारदार जुगलबंदीने नागपूरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संतूर व बासरीच्या जुगलबंदीसाठी रविवारी नागपूरकर रसिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. जागतिक स्तरावरील विख्यात असलेल्या या कलावंतांनी ...
ठळक मुद्देकालिदास महोत्सवाची थाटात सांगता : पं. सतीश व्यास व पं. रेणू मजुमदार यांचे बहारदार सादरीकरण