लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रुळाच्या कठड्यावर ‘साऊंड बॅरिअर’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे धावताना आजूबाजूची घरे, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ही केंद्रीय संस्था या सर्व बाबींचा दोन महिन्यांत अभ्यास करून ‘साऊंड बॅरिअर’ लावण्याची ठिकाणे सुचविणार आहे.महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वे भविष्यात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल जवळून जाईल. मेट्रो रेल्वे रुळावर धावताना होणाऱ्या आवाजामुळे त्यांना त्रास होईल. ‘साऊंड बॅरिअर’मुळे येणारा आवाज कमी होईल. याकरिता ‘मास स्प्रिंग सिस्टिम’ आवश्यक ठिकाणांवर लावण्यात येईल. सेंट्रल एव्हेन्यू, सीताबर्डी, काँग्रेसनगर येथे साऊंड बॅरिअर आणि मास स्प्रिंग सिस्टिम लावण्याची जास्त आवश्यकता आहे.दीक्षित म्हणाले, हिंगणा माऊंट व्ह्यू आणि पारडी असे दोन नवीन मेट्रो स्टेशन बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्टेशनची संख्या ३६ वरून ४२ झाली आहे. अन्य नवीन स्टेशनमध्ये एअरपोर्ट साऊथ, इको पार्क, मेट्रो सिटी, कॉटन मार्केट स्टेशनचा समावेश आहे. सर्व नवीन स्टेशन बचतीच्या रकमेतून बनतील. ते म्हणाले, अंबाझरी येथे क्रेझी कॅसलच्या जमिनीवर मेट्रो स्टेशनची एन्ट्री व एक्झिट येत आहे. अशास्थितीत जमीन महामेट्रोला देण्याचा निर्णय नागपूर सुधार प्रन्यास करेल.दीक्षित म्हणाले, हिंगणा रोडवर जयप्रकाशनगर, वासुदेवनगर आणि बन्सीनगर स्टेशनच्या बांधकामात भारतीय विमानतळ प्राधिकरण मानकांचा अडथळा येत होता. या मानकानुसार ‘फनल झोन’मध्ये इमारतींची उंची निर्धारित उंचीपेक्षा जास्त नको. आता बांधकामाची उंची ८० सें.मी. कमी केली आहे. शिवाजी सायन्स कॉलेजसमोर रस्त्यावरील मातीचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे त्या ठिकाणी सक्षम व मोठा पिलर उभारण्यात येत आहे. त्यासाठी मोठी जागा व्यापली आहे. यावेळी प्रकल्प संचालक महेशकुमार आणि महाव्यवस्थापक अनिल कोकोटे उपस्थित होते.रहाटे कॉलनी स्टेशन येथे बनणार ‘पॉकेट ट्रॅक’वर्धा रोडवर सेंट्रल जेलसमोरील पिलरवर पॉकेट ट्रॅक अर्थात दोनऐवजी तीन ट्रॅक बनविण्यात येणार आहे. ऐनवेळी कोणत्याही मेट्रो ट्रेनमध्ये बिघाड झाल्यास ती ट्रेन या पॉकेट ट्रॅकवर आणून उभी करता येईल. शिवाय ट्रेनला रात्रभर उभी करून सकाळी जास्त यात्रेकरूंच्या ठिकाणी अतिरिक्त मेट्रो रेल्वे सेवा देता येईल. अग्रसेन चौक आणि सुभाषनगर येथे मेट्रो स्टेशन पॉकेट ट्रॅक बनविण्यात येणार आहे.
नागपुरात मेट्रो रुळाच्या कठड्यावर लागणार ‘साऊंड बॅरिअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:31 AM
मेट्रो रुळाच्या कठड्यावर ‘साऊंड बॅरिअर’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे धावताना आजूबाजूची घरे, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ही केंद्रीय संस्था या सर्व बाबींचा दोन महिन्यांत अभ्यास करून ‘साऊंड बॅरिअर’ लावण्याची ठिकाणे सुचविणार आहे.
ठळक मुद्दे केंद्रीय एजन्सी ‘सीआरआरआय’ करणार अभ्यास : ध्वनी प्रदूषणावर प्रतिबंध