लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील काही भागात साेयाबीनच्या शेंगा पावसामुळे काळवंडल्या असून, काही भागात शेंगांमधील दाण्यांना अंकुर फुटले आहेत. या वर्षी किडी व राेगांचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने साेयाबीन उत्पादनात माेठी घट हाेणार असल्याचे तसेच साेयाबीनचा उत्पादनखर्च भरून निघणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या वर्षी कुही तालुक्यात साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. सुरुवातीच्या काळात चांगल्या स्थितीत असलेले पीक नंतरच्या काळात खाेडमाशी या किडीला व येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाला बळी पडले. जे पीक सुस्थितीत हाेते, ते कापणीच्या काळात पावसात सापडल्याने त्याच्याही शेंगा आता काळवंडायला लागल्या आहेत. मांढळ परिसरात शेंगा काळवंडण्याचे तर नवेगाव, किन्ही शिवारात साेयाबीनच्या शेंगा झाडालाच असताना त्यातील दाण्यांना अंकुर फुटल्याचे आढळून आले आहे. यावर काेणताही उपाय नसल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
कपाशी व मिरचीच्या तुलनेत साेयाबीनचा उत्पादनखर्च कमी असल्याने आपण साेयाबीनचे पीक घेताे. या वर्षी चांगली मशागतही केली. त्यामुळे फूल फलधारणा उत्तम झाली. मात्र, शेवटच्या टप्प्यात खाेडमाशी व येल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव झाला आणि संपूर्ण पीक हातचे गेले, अशी माहिती सावळी येथील शेतकरी नामदेव करारे यांनी यांनी दिली.
परिणामी, शासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना याेग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नामदेव करारे, पांडुरंग बुराडे, भागेश्वर फेंडर, प्रमोद घरडे, अरुण गोरले, भाऊराव लेंडे, वाल्मिक पोहनकर, सुरेश ठवकर, अनिल बावणे, भगवान नागलवाडे, राजानंद कावळे, वामन बुद्धे, लुकेश कुर्जेकार, राजेश तिवस्कर, अरविंद राघोर्ते या शेतकऱ्यांनी केली आहे.
..
सरासरीपेक्षा कमी पाऊस
या वर्षी कुही तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस काेसळल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आजवर तालुक्यात सरासरी ८९१.७ मिमी पावसाची नाेंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे साेयाबीनचे चांगले उत्पादन हाेणार असल्याची आशा पल्लवित झाली हाेती. मात्र, कीड व राेगाच्या प्रादुर्भावामुळे काही भागातील साेयाबीनच्या शेंगा पक्वच झाल्या नाहीत.
...
आढावा बैठकीत साेयाबीनची झाडे
काही दिवसांपूर्वी कुही पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत काही शेतकऱ्यांनी आ. राजू पारवे यांच्या समक्ष सोयाबीन नुकसानीची कैफीयत मांडली. काहींनी तर आ. पारवे व कृषी अधिकाऱ्यांना साेयाबीनची झाडेही उपटून आणून दाखविली. याची दखल घेत कृषी अधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली व उपाययाेजना सुचविल्या. मात्र, उपयाेग झाला नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.