- मेहा शर्मा नागपूर : अंतराळात जाण्याचे स्वप्न साकारण्यासाठी डॉ. प्रदीप शिंदे पुण्याहून फ्लोरिडाला गेले. आपणच नाही तर जगातील प्रत्येकाला अंतराळात जाता यावे, अशी त्यांची उत्कट इच्छा. ‘लोकमत टाइम्स’शी बोलताना शिंदे यांनी अंतराळाबद्दल त्यांच्या स्वप्नाची रूपरेषा मांडली.प्रश्न : तुमच्या नाशिक ते फ्लोरिडा प्रवासाबद्दल काय सांगाल?उत्तर : मी २५ वर्षे नाशिकमध्ये होतो व अमेरिकेत मला उच्चशिक्षण घ्यायचे होते. २००७ मध्ये मला फ्लोरिडा विद्यापीठात प्रवेश मिळाला. ते मंदीचे दशक होते तरी मी माझे स्वप्न साकारण्याच्या प्रयत्नांत होतो. माझे करिअर इलेक्ट्रिक व्हेईकल डेव्हलपमेंटने सुरू झाले. मी उपग्रह विकसित करणाऱ्या गटात सहभागी झालो. मी माझा पहिला उपग्रह विकसित केला. आम्हाला केनेडी स्पेस सेंटरने आमचा प्रकल्प लाँच करण्याचे निमंत्रण दिले. मी इलेक्ट्रिक व्हेईकल स्पर्धेत नाव नोंदवले. ती स्पर्धा संपूर्ण अमेरिकेत होती. माझ्या विद्यापीठाने माझ्या व्हेईकलबद्दल विचारणा सुरू केली. मी माझे अंतराळाचे स्वप्न साकारण्यासाठी पीएच.डी. सुरू केली. २०१६ मध्ये ‘नासा’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत मी फर्स्ट रनर अप ठरलो. अंतराळात स्वत:चा उपग्रह सोडणे हे खर्चिक असल्यामुळे मी कमी खर्चात ते करण्याचा विचार केला. मी स्पेस बलून ३५ किलोमीटरच्या पुढे जाईल यासाठी मॅथेमॅटिकल इक्वेशन बनवले. नासाने प्रस्ताव पाहिला व वर्षभराने त्याचे प्रायोजकत्व स्वीकारले.प्रश्न : स्पेस बलूनबद्दल काय सांगाल?उत्तर : तंत्रज्ञान हे अनेक बाजूंनी क्रांतिकारी असते. माझा स्वत:चा उपग्रह सोडायचा होता; पण ते झाले नाही. मग मी स्पेस बलून सुरू केले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला अवकाशात जाता येईल. प्रश्न : या नव्या शोधांचा पर्यावरणावर काय परिणाम होईल?उत्तर : हवामानावर मेसोस्फिअरचा परिणाम होतो व आमच्याकडे अग्निबाणाशिवाय त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे साधन नाही. वेदर बलुन्स मेसोस्फिअर प्रांतात असल्यावर हवामानाचे अचूक भाकीत करता येईल.प्रश्न : अंतराळ पर्यटनाबद्दल काय?उत्तर :. ही कल्पना काही दशकांनंतरची आहे. काही कंपन्यांनी ते सुरू केले आहे. एकदा तंत्रज्ञान आले की आम्ही ते सर्वांसाठी उपलब्ध करू.प्रश्न : तुम्ही क्लाऊड फंडिंगसाठी मोहीम सुरू केली आहे.उत्तर : आम्ही जे काम करत आहोत ते लोकांना सांगायचे आहे.
अंतराळ उत्साहींना ‘इस्रो’मध्ये प्रवेश हवा -डॉ. प्रदीप शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 4:11 AM