लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाने बसेसची वाहतूक थांबवली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. पहिल्याच दिवशी एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर २२ प्रवासी आल्यास लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.कोरोनामुळे एसटी बसची चाके थांबली होती. उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने बसेसचे ट्रकमध्ये रुपांतर करून मालवाहतूक सुरू केली. एसटी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवशी एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. परंतु लांब पल्ल्याच्या बसेस बंद आहेत. दूरवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने स्पेशल बसेस सोडण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत २२ प्रवासी मिळाल्यास एसटी महामंडळाच्यावतीने स्पेशल बसेस सोडण्यात येणार आहेत. यामुळे दूर अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा होणार आहे.स्पेशल बसेस सोडूअनेक प्रवाशांना दूरगावी जावे लागते. परंतु लांब पल्ल्याच्या बसेस बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होते. अशावेळी २२ प्रवासी असल्यास आम्ही लांब पल्ल्याच्या बसेस सोडणार आहोत.नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.