लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांसाठी विशेष बसेस सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ९.६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून डिझेल ऐवजी आता इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.तेजस्विनी योजनेंतर्गत महिला व युवतींसाठी विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस गुलाबी रंगाची राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला डिझेलऐवजी इलेक्ट्रिक व बायोडिझेलवर धावणाऱ्या बसेस सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार दोन दिवसातच परिवहन समितीने तेजस्विनी योजनेंतर्गत पाच बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस पर्यावरण पूरक असून डिझेलवर होणाºया खर्चात बचत होणार आहे.परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यादृष्टीने पुढील बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यात बस स्थानकांचे बांधकाम करण्याचे अधिकार वाहतूक विभागाऐवजी परिवहन विभागाला देण्यात येतील. सोबतच जाहिरात एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.परिवहन विभागाचा डिझेलवर धावणाऱ्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. परंतु खर्चाचा विचार करता इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रस्तावात बदल करण्यात आला. तसेच बायोडिझेल व सीएनजीवर बसेस चालविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.ई-तिकीट मशीनचा प्रस्ताव अडकणारवेरिफोन ई-तिकीट मशीनची खरेदी समितीची मंजुरी न घेता करण्यात आलेली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी समितीपुढे ठेवला जाणार आहे. परंतु मशीन खरेदीबाबतचा प्रश्न परिवहन समितीचे सदस्य नितीन साठवणे यांनी सभागृहात उपस्थित केला होता. त्यामुळे या प्रस्तावाला समितीत मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे.प्रशिक्षण न देताच मशीनचा वापरपरिवहन विभागाने खरेदी केलेल्या ई-तिकीट मशीन वाहकांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परंतु वाहकांना या मशीनचा वापर करता येत नाही. वास्तविक या मशीनचा वापर करण्याबाबत वाहकांना प्रशिक्षण देण्याची गरज होती. त्यामुळे तिकीट न देता पैसे गोळा क रण्यात येतात. ही रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपुरात महिलांच्या विशेष बसेस इलेक्ट्रिकवर धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:48 PM
तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांसाठी विशेष बसेस सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ९.६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून डिझेल ऐवजी आता इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
ठळक मुद्देमनपा तेजस्विनी योजनेतून पाच बसेस खरेदी करणार