नागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २६ जून ते २७ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम राबविली जाईल. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप केले जातील.
सन २०२३-२४ मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थी असल्यास त्यांना आरक्षणातंर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांचेकडे प्रवेशापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच जेईई, नीट, एमबीए, बीई सेकंट इयर, एम.एड., बी.एड., औषधनिर्माण शास्त्र पदविका व या अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे परंतु त्यांनी अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता अर्ज सादर केलेला नाही त्यांनी समितीकडे प्रमाणपत्र मिळणेकरीता सीईटी परीक्षेच्या गुणपत्रिकेसह तात्काळ अर्ज सादर करावा.अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील जे विद्यार्थी सन २०२३-२४ मध्ये प्रवेश घेणार आहे त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे सर्व अर्ज तात्काळ भरून पाठवावे. विद्याथ्र्यांनी अर्ज भरुन सर्व कागदपत्रासह तात्काळ कार्यालयात सादर करावे. इतर जिल्हातील जातीचे प्रमाणपत्र असल्यास संबंधित समितीकडे अर्ज पाठवावे.
- ऑनलाईन अर्ज कराwww.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा व अर्जासोबत सर्व कागदपत्रे राजपत्रित अधिकान्यांकडून साक्षांकीत करुन तसेच ऑनलाईन अपलोड करुन अर्जासोबत सलंग्न करुन सादर करावे. कुठलेही खोटे पुरावे जोडू नये. प्रस्तावासोबत सादर करीत असलेले सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करुन सर्व कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती विलंबाबाबतच्या हमीपत्रासह प्रस्ताव कार्यालयामध्ये त्वरीत सादर करावा.- जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास समिती जबाबदार राहणार नाही याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. जात वैधता प्रमाणपत्राकरीता प्रस्ताव सादर करताना त्रयस्थ व्यक्तीकडे काम सोपवू नये. स्वतः स्वतःचे प्रस्ताव सादर करावे.सुरेंद्र पवार,उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर