शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

नागपूर विशेष सत्र न्यायालय : नवोदय बँक घोटाळ्यातील दोन आरोपींचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:10 PM

एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी राजेश श्रीधर बांते (४३) व राजेश मल्लेशाम बोगुल (३८) यांचा पाच दिवसाचा पीसीआर मंजूर केला. हे दोघेही बँकेमध्ये व्यवस्थापक होते.

ठळक मुद्देआरोपींमध्ये राजेश बांते, राजेश बोगुल यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी राजेश श्रीधर बांते (४३) व राजेश मल्लेशाम बोगुल (३८) यांचा पाच दिवसाचा पीसीआर मंजूर केला. हे दोघेही बँकेमध्ये व्यवस्थापक होते. बांते हा बालाजीनगर (मानेवाडा रोड) तर, बोगुल हा जयताळा येथील रहिवासी आहे.धंतोली पोलिसांनी या आरोपींना मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास अटक केली. तसेच, त्यांना बुधवारी न्यायालयासमक्ष हजर करून त्यांचा १० दिवसाचा पीसीआर देण्याची मागणी केली. सरकारच्यावतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा पुढील तपास, इतर आरोपींना अटक करणे व गुन्ह्यासंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस आणणे याकरिता आरोपींचा पीसीआर मिळणे आवश्यक आहे असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींचा पाच दिवसाचा पीसीआर मंजूर केला.माजी आमदार अशोक धवड व्यवस्थापकीय संचालक असलेल्या या बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयाचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक फुलपगारे प्रकरणाचा तपास करीत आहेत.अशोक धवड यांच्यासह बँक संचालिका किरण धवड, संचालक विजय जोशी, गोविंद जोशी, मुकेश जोशी, राकेश जोशी, विकेश जोशी, प्रकाश शर्मा, सचिन मित्तल, प्रीती मित्तल, बालकिशन गांधी, लीना गांधी, हिंगल ग्रुप, झाम ग्रुप, ग्लॅस्टोन ग्रुप, सिगटिया ग्रुप, देवघरे बिल्डर्स, सोमकुवर ग्रुप, गुलरांधे ग्रुप, पिरॅमिड ग्रुप व ३० कर्जदारांची या घोटाळ्यात काय भूमिका आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.पोलिसांनी मांडलेले मुद्दे२०१४-१५ मध्ये बँकेतून चार कोटी तीन लाख रुपयाची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. प्रकाश शर्मा व विकेश जोशी यांच्या नावाने प्रत्येकी १ कोटी १५ लाख रुपयाचे बनावट कर्ज प्रकरण तयार करण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी पूर्वी कॉसमॉस बँकेत नोकरीला होते. आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते असे मुद्दे पोलिसांनी न्यायालयासमक्ष मांडले.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीArrestअटकCourtन्यायालय