शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपूरला हवे ३५० कोटींचे विशेष अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:38 AM

नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने १९९५-९६ साली शासनस्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्षे अनुदान मिळाले, पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष साहाय्यता अनुदान मिळावे म्हणून महापालिका राज्य सरकारकडे दरवर्षी ३२५ कोटींची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत येणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीकडे प्रस्ताव : मनपा विशेष विकास साहाय्यता अनुदान म्हणून शासनाकडे मागणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने १९९५-९६ साली शासनस्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्षे अनुदान मिळाले, पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष साहाय्यता अनुदान मिळावे म्हणून महापालिका राज्य सरकारकडे दरवर्षी ३२५ कोटींची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत येणार आहे.गेल्या चार वर्षापासून राज्यात भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने याआधीच विशेष साहाय्यता अनुदानाचा प्रस्ताव पाठविला असता तर महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नसता. तूर्त महापालिका प्रस्ताव पाठविणार आहे. मंजूर करायचा की नाही, हे मात्र राज्य सरकारच्या हातात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० आॅक्टोबर १९९५ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर शहराच्या विकासासाठी विशेष अनुदान मंजूर करण्यात आले होते. शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. १९९५-९६ पासून सलग पाच वर्ष निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरवर्षी १५ कोटी म्हणजेच पाच वर्षात ७५ कोटी मिळणार होते. याला मंजुरीही मिळाली होती. मात्र विशिष्ट स्वरूपात अनुदान मिळाले नाही. वर्ष २००६-०७ ते २०१०-११ विशेष अनुदान म्हणून फक्त १५.५९ कोटी मिळाले. त्यानंतर २०११-१२ पासून विशेष अनुदान बंद करण्यात आले. वास्तविक उपराजधानीला नियमित अनुदान मिळणे अपेक्षित होते.सध्या महापालिकेला वेतन, पेन्शन, वीज, पाणी, देखभाल व इंधन यासह अन्य बाबींवर महिन्याला ९२ कोटींचा खर्च करावा लागतो. जकात व एलबीटी बंद झाल्याने जीएसटी अनुदानावर महापालिकेला निर्भर राहावे लागते. परंतु अपेक्षित अनुदान मिळत नाही. दरवर्षी खर्च वाढत आहे. पुढील सात वर्षात विकास योजनांवर महापालिकेला मोठा खर्च करावयाचा आहे. यासाठी विशेष अनुदानाची गरज आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.सात वर्षात मनपावर ३०१२.३९ कोटींचा बोजाविविध विकास प्रकल्पामुळे पुढील पाच ते सात वर्षात महापालिकेवर ३०१२.३९ कोटींचा बोजा पडणार आहे. हा निधी उभारताना महापालिकेला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष अनुदानाची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी ६५८.७८ कोटी, सिमेंटरोडच्या दोन टप्प्यातील कामांसाठी २०० कोटी, परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी ५४० कोटी, अमृत योजनेसाठी ११३.३५ कोटी, हुडकेश्वर, नरसाळा विकासासाठी २५ कोटी, एलईडी पथदिव्यासाठी २७०.४८ कोटी, भांडेवाडी एसटीपीसाठी १३० कोटी, वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ९० कोटी, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ११४.२८ कोटी, नागनदी प्रकल्पासाठी १८७.८४ कोटी यासह विविध योजनांसाठी निधी खर्च करावयाचा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी