लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतुदीची घोषणा करण्यात आली असून, २०१९मध्ये हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना आर्थिक मदत जाहीर करत असल्याची माहिती अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.नाट्य परिषदेतील अंतर्गत नाराजी सत्रानंतर आज पार पडलेल्या कार्यकारिणीच्या सभेत नाट्य परिषदेतर्फे २०१९मध्ये पार पडलेल्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या राज्यातील ४१६च्या वर नाट्य संस्थांना आर्थिक मदत देऊ केली आहे. कोरोनाच्या काळात आतापर्यंत हौशी रंगकर्मींची दखल राज्य शासनातर्फेही घेतली गेली नाही. शिवाय, राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना नाट्य सादरीकरणानंतर मिळावयाचा परतावा अद्याप दिला गेला नाही. तेव्हा त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून नाट्य परिषदेतर्फे प्रत्येकी ६ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. यासाठी स्पर्धेत सहभागी संस्थांनी नाट्य परिषदेच्या ई-मेलवर स्पर्धेत सहभागी झाल्याचा कोणताही एक पुरावा आणि बँक डिटेल्स पाठवायचे आहेत. या शिवाय, मुंबई येथे असलेल्या यशवंत नाट्य मंदिर संकुलाची पुनर्उभारणी करण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आल्याचे कांबळी यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर, नाथा चितळे, मंगेश कदम आदी उपस्थित होते.रंगकर्मींच्या विम्यासंदर्भात विचार करूनाट्य परिषदेतर्फे राज्यातील रंगकर्मींच्या आरोग्य विम्याचा प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. परिषदेचे २७ हजार सदस्य असून, त्या प्रत्येकाचा विमा काढणे कठीण आहे. मात्र, विमा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, आगामी काळात नियामक मंडळाच्या बैठकीत यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. शिवाय, नाट्य परिषदेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मींसाठी पेन्शन दिली जाते. मात्र, त्याचा लाभ केवळ २५ ज्येष्ठांनाच मिळाला आहे. तोही मुद्दा निकाली काढण्यात येईल. शिवाय, ‘नागपूर लोकमत’ने राज्यातील नाट्यलेखकांच्या नाट्यसंहितांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरही योग्य त्या उपययोजना केल्या जातील, अशी हमी कांबळी यांनी यावेळी दिली.सतीश लोटके यांचा बोलविता धनी कोण?नाट्य परिषदेच्या प्रत्येक निर्णयात नाट्य परिषदेचे सहकार्यवाह स्वत: उपस्थित राहत आहेत, असे असतानाही त्यांना आत्ताच का गैरव्यवहार दिसतो, हे कळले नाही. त्यांच्या तक्रारीत ते कुणावरच विश्वास करत नाहीत, असे स्पष्ट झाले आहे. तेव्हा त्यांना व्यवहार कसा सांगावा? त्यांचा बोलविता धनी कोण आहे, ते लवकरच कळेल असे कांबळी यावेळी म्हणाले.
नाट्य परिषदेतर्फे राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 1:00 AM
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतुदीची घोषणा करण्यात आली असून, २०१९मध्ये हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना आर्थिक मदत जाहीर करत असल्याची माहिती अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देराज्य नाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना आर्थिक मदत