लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवरात्रात मध्य प्रदेशातील मय्यर येथे मोठी यात्रा भरते. नागपूरसह विदर्भातून हजारो भाविक मय्यरला दर्शनासाठी जातात. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या १० रेल्वेगाड्यांना रेल्वे प्रशासनाने मय्यर रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरहून धावणारी ११०४५ छत्रपती शाहू टर्मिनस-धनबाद दीक्षाभूमी साप्ताहिक एक्स्प्रेस ३ ते १० ऑक्टोबर दरम्यान, १२६६९ चेन्नई सेंट्रल-छपरा गंगाकावेरी द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान, १२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेस २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान, १२५७८ मैसूर-दरभंगा बागमती साप्ताहिक एक्स्प्रेस २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान, १७६१० पूर्णा-पाटणा साप्ताहिक एक्स्प्रेस ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान मय्यर स्थानकावर थांबेल. परतीच्या प्रवासासाठी ११०४६ धनबाद-छत्रपती शाहू टर्मिनस दीक्षाभूमी साप्ताहिक एक्स्प्रेस ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान, १२६७० छपरा-चेन्नई सेंट्रल गंगाकावेरी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान, १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान, १२५७७ दरभंगा-मैसूर बागमती साप्ताहिक एक्स्प्रेस १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान, १७६०९ पाटणा-पूर्णा साप्ताहिक एक्स्प्रेस २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान मय्यर स्थानकावर थांबणार आहे.
नवरात्रीसाठी मय्यर रेल्वेस्थानकावर विशेष थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:47 AM