शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कामगार रुग्णालयात आता विशेषज्ञांची सेवा : सात जागा भरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:52 PM

Employees Hospital, Specialist Doctors, Nagpur News कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात विशेषज्ञांच्या १४ पैकी तब्बल ११ जागा रिक्त होत्या. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त लावून धरले. यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाले. अखेर रुग्णालय प्रशासनाला विशेषज्ञांची पदे भरण्याचे अधिकार देण्यात आले.

ठळक मुद्दे रुग्ण ‘रेफर’ करण्याचे प्रमाण होणार कमी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात विशेषज्ञांच्या १४ पैकी तब्बल ११ जागा रिक्त होत्या. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त लावून धरले. यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाले. अखेर रुग्णालय प्रशासनाला विशेषज्ञांची पदे भरण्याचे अधिकार देण्यात आले. यामुळे नुकतेच नेत्र रोग, शल्यचिकित्सा, बधिरीकरण, छाती रोग, अस्थिव्यंगोपचार, मानसोपचार व पॅथॉलॉजिस्ट तज्ज्ञाची पदे भरण्यात आली.सोमवारीपेठ येथील कामगार विमा रुग्णालयाशी तीन लाखांवर कामगार जुळले आहेत. त्यांचे कुटुंब धरून ही संख्या १२ लाखांवर जाते. या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी या रुग्णालयावर आहे. रुग्णांना विशेषज्ञाची सेवा मिळावी म्हणून अस्थिव्यंगोपचार, मानसोपचार, औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन), शल्यचिकित्सक, पॅथॉलाजिस्ट, बालरोग, बधिरीकरण, ईएनटी, नेत्ररोग, श्वसनरोग, रेडिओलॉजी आणि स्त्रीरोग व प्रसूती आदी १४ विशेषज्ञाच्या पदांना मंजुरी देण्यात आली. परंतु दरम्यानच्या काळात रिक्त होत गेलेली पदे भरण्यातच आली नाही. विशेषज्ञांच्या रिक्त पदाची जबाबदारी प्रशासनाने पार्ट टाईम डॉक्टरांवर टाकली होती. परिणामी, मेडिकलमध्ये रुग्णांना ‘रेफर’ करण्याचे प्रमाण वाढले होते. ‘लोकमत’ने ‘विशेषज्ञांच्या १४ पैकी ११ जागा रिक्त’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल तत्कालीन आ. प्रकाश गजभिये यांनी घेतली. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोप यांनी रिक्त पदे शासनाकडून नियमित पदे भरले जातील, असे लेखी उत्तर दिले. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाला विशेषज्ञाची पदे भरण्याचे अधिकार दिले. मागील महिन्यात नेत्र रोग, शल्यचिकित्सा, छाती रोग, बधिरीकरण, अस्थिव्यंगोपचार, मानसोपचार व पॅथॉलॉजिस्ट तज्ज्ञांच्या पदांची जाहिरात काढून कंत्राट पद्धतीवर ही पदे भरण्यात आली. यातील काही पदांवर जुनेच डॉक्टर कायम आहेत. यामुळे त्यांच्या रुग्णसेवेकडेही अनेकांचे लक्ष राहणार आहे.रुग्णसेवेत सुधार होईलरुग्णालयात विशेषज्ञांच्या रिक्त जागेमुळे रुग्णसेवा देताना अडचणी यायच्या. रिक्त जागांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यातही आला होता. त्याचा पाठपुरावाही केला जात होता. अखेर कामगार आयुक्तांनी स्थानिक स्तरावर विशेषज्ञ भरण्याची परवानगीचे अधिकार दिले. यामुळे रिक्तपदे भरण्यात आली. विशेषज्ञाच्या सेवेमुळे रुग्णसेवेत सुधार होर्ईल.-डॉ. मीना देशमुखवैद्यकीय अधीक्षक, कामगार विमा रुग्णालय

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर