मुख्यमंत्र्यांचे निर्देश : सीएम वॉर रूममध्ये बैठकनागपूर : उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-३ व नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सीएम वॉर रुममध्ये बैठक घेत नागपूर मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाला गती द्या, असे निर्देश दिले.बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. यावेळी नागपूर मेट्रोच्या कामांसाठी करावयाच्या भूसंपादनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, भूूसंपादनाबाबत असलेल्या अडचणी प्रशासकीय स्तरावर तत्काळ निकाली काढून जमीन हस्तांतरित करावी. जेणेकरून प्रकल्पाच्या कामाला विलंब होणार नाही. या प्रकल्पांतर्गत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची नियमित बैठक घेण्यात यावी. त्यांना त्यांच्या पुनर्वसनाबाबत वेळोवेळी माहिती दिल्यास प्रकल्पाला असलेला विरोध मावळण्यास मदत होईल. भूसंपादन प्रक्रिया वेळेत झाल्यास प्रकल्पाची किंमत वाढत नाही आणि सामान्यांना देखील वेळेवर सेवा मिळते या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.(प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाला गती द्या
By admin | Published: August 15, 2015 2:57 AM