शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : नितीन गडकरी यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 1:14 AM

नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करा, तसेच प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. शासनाच्या विविध विभागांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या, प्रस्तावित आणि निर्माणाधीन प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी गडकरी यांच्या निवासस्थानी बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देविविध प्रकल्पांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करा, तसेच प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. शासनाच्या विविध विभागांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या, प्रस्तावित आणि निर्माणाधीन प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी गडकरी यांच्या निवासस्थानी बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीला महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापती शीतल उगले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार आदी उपस्थित होते.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे पाच हजार गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून वाटपासाठी तयार आहेत, अशी माहिती शीतल उगले यांनी दिली. योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची सोडत काढण्यात यावी. अपूर्ण अर्जांमधील त्रुटी दूर करून, आवश्यक बाबींची पूर्तता करून त्या अर्जांचाही सोडतीत समावेश करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले.अंबाझरी येथील खुल्या रंगमंचासाठी (हॅम्पी थिएटर) आवश्यक २३ एकर जागेपैकी साडेसात एकर जागेचा ताबा नासुप्रला मिळाला असल्याची माहिती उगले यांनी दिली. उर्वरित जागेसंदर्भात जिल्हाधिकारी आणि नासुप्र सभापतींनी तातडीने विद्यापीठ कुलगुरूंशी बैठक घ्यावी व ती जागा ताब्यात घ्यावी. त्या जागेवर सुरक्षा भिंत करून शक्य तितक्या लवकर पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, गड्डीगोदाम, पारडी, सोमलवाडा, रामजी पहेलवान मार्गासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला संमतीपत्र देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. गड्डीगोदाम आणि पारडी रस्त्यांबाबतची कार्यवाही १ फेब्रुवारी रोजी, जुना भंडारा रोड, केळीबाग रोड, रामजी पहेलवान रस्त्याबाबतची कार्यवाही ६ फेब्रुवारी रोजी तर गड्डीगोदाम, सोमलवाडा रस्त्यांबाबतची कार्यवाही १६ फेब्रुवारी रोजी सुरू करा. सक्करदरा येथील बुधवार बाजाराचे अंतिम डिझाईन सात दिवसांत तयार करून त्याच्याही निविदा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.मेमोरियलचा नवीन प्रस्ताव तयार करायशवंत स्टेडियम येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियलसंदर्भात सूचनांसह नवीन प्रस्ताव तयार करण्यात यावा. स्थायी समिती अध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी त्याला अंतिम स्वरूप देऊन तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देशही गडकरी यांनी दिले. नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे पाटणी चौकापर्यंत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलाच्या लॅण्डींगमधील तांत्रिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने व्यवहार्यता तपासण्यात यावी व त्यानंतरच त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा. अजनी पूल ते वर्धा रोडला जोडणाऱ्या कारागृह परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण शक्यतो २२ फेब्रुवारी दरम्यान करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.विद्यार्थ्यांसाठी १० कोटींचे विज्ञान केंद्रनागपूर महानगरपालिकेचे विद्यार्थी अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर नावीन्यपूर्ण मॉडेल तयार करतात. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मनपाच्या एखाद्या बंद शाळेच्या जागेवर सुंदर इमारत करून विज्ञान केंद्र विकसित करण्यात यावे. यामुळे शहरातील विद्यार्थी वैज्ञानिकांना वाव मिळेल, अशी सूचना प्रवीण दटके यांनी केली. त्यानुसार राहतेकर वाडी येथील शाळेच्या जागेवर ही इमारत उभारण्यासाठी १० कोटींचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.खेळाच्या मैदानांचा विकासनागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत खेळाच्या मैदानांचा विकास करण्याकरिता ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या मैदानांसाठी जिल्हाधिकऱ्यातर्फे लाल मुरुम घेऊन त्यावर टाकण्यात यावा. नासुप्रने तयार केलेल्या कमी क्षमतेच्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातील पाणी टँकरद्वारे या मैदानांवर टाकण्यात यावे. काही पाणी निमार्णाधीन इमारतींना व्यावसायिक स्वरूपात देण्यात यावे. यासाठी आवश्यक किमान १५ ते २० टँकर नासुप्रने खरेदी करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर