लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (बुटीबोरी) : अतिवेगात असलेली स्कूल बस गतिरोधक व खड्ड्यावरून उसळल्याने हिंगणानजीकच्या सालईदाभा येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अपघात झाला. यात एकीचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या.संस्कृती लोकेश शर्मा (१४) रा. बोरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. महक शेख (१४), अर्पिता बाळकृष्ण वानखेडे (१४), रितिका समीर दास (१४) सर्व रा. बोरी अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. त्यांच्यावर बोरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व मुली नागपुरातील धीरन कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत.धीरन कन्या विद्यालयाची स्कूल बस क्रमांक एमएच ४० एटी ०३९४ विद्यार्थ्यांनी घरी सोडत असताना सालईदाभा(हिंगणा)मार्गे बुटीबोरीकडे येताना सालईदाभा नजीकच्या रस्त्यावरील गतिरोधक आणि खड्ड्यावरून बस उसळली. बस अतिवेगात असल्याने चालकाचे स्टेअरिंगवरून काही क्षणासाठी नियंत्रणही सुटले. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या विद्यार्थिनी जागेवरून बसमध्येच खाली पडल्या. बसमध्ये १५ ते २० विद्यार्थिनी होत्या. यात काही मुलांना गंभीर जखमा झाल्या. यात डोक्याला मार लागल्याने संस्कृती लोकेश शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका मुलीच्या बयानानुसार बसचा कंडक्टर दीपक शिवपाल बरोदे (२९) रा. बैतूल हा बस चालवीत होता. त्याच्या शेजारी बस चालक अमोल सायवाण रा. सीताबर्डी हा बसला होता. तो दारू पिऊन होता. अपघातानंतर बस चालकाने स्कूल बस बोरी येथील खासगी रुग्णालयात आणली. तिथे आम्हाली उपचारासाठी दाखल केले. याच काळात तो तिथून पसार झाला. या अपघातात बस चालविणारा कंडक्टर दीपक हाही जखमी झाला आहे. त्याच्यावर बोरी येथील याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी बसचालकाविरु द्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार या घटनेचा तपास करीत आहेत.
वेगाने घेतला विद्यार्थिनीचा जीव : स्कूल बस खड्ड्यात उसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:44 PM
अतिवेगात असलेली स्कूल बस गतिरोधक व खड्ड्यावरून उसळल्याने हिंगणानजीकच्या सालईदाभा येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अपघात झाला. यात एकीचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या.
ठळक मुद्देकंडक्टरचा हलगर्जीपणा भोवलानागपूर जिल्ह्यातील हिंगणानजीकच्या सालईदाभा येथील घटना