शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

नागपूर जिल्ह्यात भरधाव तवेरा उलटली : दोघांचा मृत्यू, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:15 AM

वेगात असलेल्या तवेरावरील चालकाचा ताबा अचानक सुटला आणि ती दुभाजकावर आदळून उलटली. एवढेच नव्हे तर ती तवेरा चार कोलांट्या घेत रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन स्थिरावली. यात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला

ठळक मुद्देसावनेर - पांढुर्णा महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर/केळवद) : वेगात असलेल्या तवेरावरील चालकाचा ताबा अचानक सुटला आणि ती दुभाजकावर आदळून उलटली. एवढेच नव्हे तर ती तवेरा चार कोलांट्या घेत रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन स्थिरावली. यात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, अन्य सात कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील दोघे अत्यवस्थ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ही घटना सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रापूर शिवारात शनिवारी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास घडली.मारोतराव परयाम (४२) व विनोद राऊत (२३) दोघेही रा. अंबाडा (खुर्द), ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये गंभीर जखमी सोमखलाल खंडाते (३०), दुर्गादास उईके (३०), वीरेंद्र मालकाम (२३), पुंडलिक कुंभरे (२८), रामनाथ खंडारे (२५), दिनेश खंडारे (३५) व अंबादास उईके (४०) सर्व रा. अंबाडा (खुर्द), ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा यांचा समावेश आहे.सावनेर तालुक्यात कापसाचे काही खासगी जिनिंग आहेत. त्यातील एका जिनिंगमध्ये कामगारांची आवश्यकता असल्याने विजय वंजारी, रा. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा हे या सर्व कामगारांना एमएच-२३/वाय-०८२४ क्रमांकाच्या तवेराने पांढुर्णा येथून सावनेरला आणत होते. सुसाट वेगात असलेली ही तवेरा छत्रापूर शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर धडकली व उलटली. या तवेराने चार कोलांट्याही घेतल्या.यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य सात जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारार्थ तसेच दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. जखमींवर प्रथमोपचार केल्यानंतर सर्वांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वैद्य यांनी दिली.या कामगारांसंदर्भात तालुक्यातील सर्व जिनिंगमध्ये संपर्क साधून विचारणा केली असता, कुणीही सदर कर्मचारी आपल्या जिनिंगमध्ये कामाला येत असल्याचे सांगितले नाही. अपघातामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचेही काहींनी सांगितले. याप्रकरणी केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास ठाणेदार सुरेश मट्टामी करीत आहेत.

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू