प्रा. डॉ. संदीप ताटेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: साधारण २५ वषार्नंतर गावाकडील मंदिरात जाण्याचा योग आला होता. मंदिर पूर्णपणे बदललेले होते. मंदिराच्या आवारात सभोवताल तारेचे कुंपण केले होते व मंदिरात प्रवेश करण्यासाठी कुंपणाला फक्त एकच मुख्य प्रवेशद्वार ठेवण्यात आले होते. प्रवेशद्वाराजवळ एक मोठा फलक लावला होता. त्यावर मोठ्या व ठळक अक्षरात लिहिले होते की, मंदिर परिसरात कोणीही मद्यपान करू नये, जुगार खेळू नये, धुम्रपान करू नये, गैरवर्तन करू नये, मंदिराचे पावित्र्य राखावे. अशा कितीतरी सूचना फलकावर लिहिल्या होत्या. मंदिराच्या व्यवस्थापन समितीला फलकावर या सूचना लिहाव्या लागणे व सुरक्षा रक्षक नेमावा लागणे या सारखे प्रयत्न मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी छोट्या गावात करावे लागते आहे याबाबत आश्चर्य वाटले. मंदिराचा पुजारी सांगत होता की, माणस मंदिराच्या परिसरात येऊन चोऱ्या करतात म्हणून मंदिरात दानपेट्या व मूर्तीचा गाभारा लोखंडी दाराने सुरक्षित केला आहे. पूर्वी असल्या सुरक्षा मंदिरात नव्हत्या. माणसं साधीभोळी होती. मंदिरात वाईट कर्म करायची कोणाची हिंमत होत नव्हती. माणस देवाला घाबरायची. मात्र आज देवालाच माणसापासून घाबरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काय चांगलं व काय वाईट हेच आपल्याला समजत नाही. आपण चांगल्याला वाईट व वाईटाला चांगलं समजतो. म्हणूनच संत गाडगे बाबा म्हणतात,गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपालासांभाळ ही तुझी लेकरे , पुण्य समजती पापालाआज माणस देवाच्या व धर्माच्या नावावर सप्तरंगात विभागली गेली आहे व त्यासाठी आपसातच भांडत आहे. जातीय द्वेष पसरवित आहे. स्वत:च्या स्वाथार्साठी समाजात दंगली घडवून आणण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे सुद्धा नुकसान करीत आहे. ईश्वराच्या मागे धावण्यापेक्षा माणूस नश्वराच्या मागे धावत आहे. बुवाबाजी करून भोळ्याभाबड्या या भक्तांना देवाच्या नावावर गंडवित आहे. खरंच आपण आपली नीतिमत्ता हरवलेली आहे काय? माणस सदगुणाला दुर्गुण व दुगुर्णाला सद्गुण समजत आहेत. सज्जन माणसाला कमजोर समजून त्याच्या मागे विनाकारण लागत आहे तर दुर्जनाला सलाम ठोकत घाबरून राहत आहे. म्हणूनच बहिणाबाई चौधरी म्हणतात,माणसा माणसा तुझी नियत बेकारतुज्यावून बरं गोठ्यातलं जनावरलोभासाठी झाला माणसाचा काणूसकधी होशील रे तू माणूस !