नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर लोकमतने सुरू केलेल्या राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियान ‘लोकमत रक्ताचं नातं’ ला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक भान जपत रविवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या अभियानात आपला सहभाग नोंदविला.
आर संदेश फाऊंडेशन
आर संदेश फाऊंडेशनने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महायज्ञात सहभागी होत संदेश दवा बाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिराचा शुभारंभ आर संदेश फाऊंडेशनचे चेअरमन गोपाल अग्रवाल, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, कैलाश जोगानी, कैलाश लिलडिया, ज्योती अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. कार्यक्रमाला राजू आया, राकेश हेमराजानी, पुरुषोत्तम लिलडिया, लाला लुनावत, धवल पोद्दार, गोपाल मेहाडिया, दिनेश सारडा, मधु अग्रवाल, गोविंद पराते, कमलेश लाखानी, अतुल चौटाई, नारायण सतेजा, मनोहर अग्रवाल, गिरीश लिलडिया यांनी सहकार्य केले. फाऊंडेशनने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गरजूंची मदत केली असून यापुढेही हे समाजकार्य सुरूच राहणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी सांगितले. तर कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे कैलाश जोगानी यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. आभार गिरीश लिलडिया यांनी मानले.
पर्यावरण व निसर्ग संस्था घोगली
घोगली येथील पर्यावरण व निसर्ग संस्थेच्या वतीने गट ग्रामपंचायत बेसा-बेलतरोडी व पिपळा-घोगलीच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत बेसा येथील स्वामीधाम श्री स्वामी समर्थ मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी गट ग्रामपंचायत बेसाचे सरपंच सुरेंद्र बनाईत, पिपळाचे सरपंच नरेश भोयर, उपसरपंच प्रभू भेंडे , स्वामीधाम मंदिराचे अध्यक्ष दिनकर कडू, अर्ध्य सैनिक कॅन्टीनचे संचालक राहुल मानकर, चित्रकला व शिल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे निरीक्षक संदीप डोंगरे, खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूरचे निवृत्त संचालक राहुल गजभिये, बी. एम. रेवतकर, राजेश कडू, पर्यावरण व निसर्ग संस्थेचे सचिव मधुकर सुरवाडे, कोषाध्यक्ष राजेश सोनटक्के, राजेंद्र राजूरकर, अभय पवार, राम सेवतकर, अभिराम श्रोत्री, धनंजय खराडे प्रामुख्याने उपस्थित होते. लाईफ लाईन रक्तपेढीचे डॉ. रवी गजभिये व त्यांच्या चमूने या रक्तदान शिबिरामध्ये मोलाचे योगदान दिले.लोकमतच्या या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरण व निसर्ग संस्थेने कौतुक करून भविष्यातदेखील या समाजाभिमुख उपक्रमात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
............