नागपूर: ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेअंतर्गत राज्यभर २ ते १५ जुलैदरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यास रविवारी नागपूर जिल्ह्यातील कोराडी (कामठी), सावनेर, मौदा आणि पारशिवनी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चारही तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्यावतीने नागरिकांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यासोबतच ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेचे कौतुकही केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. त्या काळात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला होता. पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासोबतच आपल्या माध्यमातून इतरांचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने नागरिक स्वयंस्फूर्तपणे या शिबिरात सहभागी होत आहेत.
शिवमित्र परिवार, ओम साई नगर, कोराडी
कोराडी : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह व शिवमित्र परिवाराच्यावतीने रविवारी ओम साई नगर, कोराडी रोड येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री महर्षी साईबाबा मंदिरात आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, डॉ. मिलिंद माने यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुषमा चौधरी, महेंद्र धनविजय, वीरेंद्र कुकरेजा, साहेबराव लांडे, आनंदराव काळे, प्रकाश देवा, कमल वाघधरे, रत्नदीप रंगारी, गजानन सुपे, विठ्ठल भालेराव, बालकृष्ण मिश्रा उपस्थित होते. शिबिराचे आयोजन शिवमित्र परिवाराचे योगेश वडुरकर यांनी केले. या शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रवीण लांडे, संजय जाधव, सतीश पवार, प्रवीण पायतोडे, गुड्डु ठाकूर, स्नेहजित काकडे, गुलाब खैरे, राजेश पायतोडे, खेमराज दमाहे, शरद वांढे, अखिल पेढेकर, समीप नरुले, संजय बेलेकर, निखिल पेढेकर, निखिल पोहाणे, अनुप मेंढे, संजय सातफळे, नितीन काळे, शेखर आसरे, खुशाल डोईफोडे, प्रवीण काळे, सुरेंद्र वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.