शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

उपराजधानीतील लोकमत महामॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 1:16 PM

‘निरोगी, सुदृढ आयुष्य जगा’ असा संदेश देणाऱ्या लोकमत महामॅरेथान: सीझन-३ चे आयोजन नागपुरात रविवार २ फेब्रुवारी २०२० रोजी होत आहे.

ठळक मुद्देधावपटूंना मिळणार रंगीत मेडल२ फेब्रुवारी रोजी रंगणार महासंग्रामधावपटूंची नावनोंदणीसाठी लगबगबक्षिसांची लयलूट करण्याची मिळणार संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘निरोगी, सुदृढ आयुष्य जगा’ असा संदेश देणाऱ्या लोकमत महामॅरेथान: सीझन-३ चे आयोजन नागपुरात रविवार २ फेब्रुवारी २०२० रोजी होत आहे. महामॅरेथॉननिमित्त नागपूरकरांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे. ‘प्लास्टो’ हे महामॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक असून ‘नागपूर महामेट्रो’ सहप्रयोजक आहेत.त्यामुळे लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी अखेरचा पल्ला धावपटूंसाठी आहे. खेळाडूंना आता तात्काळ महामॅरेथॉनमध्ये आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक असेल. १ डिसेंबर रोजी नाशिक येथे झालेल्या महामॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलात १५ डिसेंबर रोजी झालेल्या महामॅरेथॉनमध्येही महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील धावपटूंनी भरभरून प्रतिसाद दिला. कोल्हापूर येथे आज रविवारी आयोजित झालेल्या महामॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जोरदार पाठिंबा दर्शविला. प्रत्येक पर्वात विक्रमी धावपटूंचा सहभाग आणि बक्षिसांची मोठी रक्कम हे लोकमत महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले आहे. आता तातडीने नागरिक, महिला, खेळाडू, युवक-युवतींनी नोंदणी करून सहभाग निश्चित करण्याची वेळ आली आहे. निरामय आरोग्याचा संदेश देणारी ही महामॅरेथॉन ५ कि.मी. अंतराची ‘फन रन’ (वय वर्ष १२ पेक्षा अधिक तसेच धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० कि.मी.ची ‘पॉवर रन’ (१६ वर्षांहून अधिक), २१ कि.मी. (१८ वर्षांहून अधिक) असणार आहे. याशिवाय ३ कि.मी. अंतराची ‘फॅमिली रन’देखील राहील. ती सर्वांसाठी खुली असेल. या महामॅरेथॉनसाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे.जास्तीत जास्त नागरिक, खेळाडू, महिला आणि धावपटूंनी लवकरात लवकर नाव नोंदवून प्रवेश निश्चित करावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.उद्दिष्ट साध्य केल्यानंतर दिले जाणारे मेडल हे धावपटूंसाठी नेहमीच संस्मरणीय ठरते. यंदाचे मेडल हे सहभागी होणाऱ्यांसाठी तर आणखीच संस्मरणीय ठरणार आहे. विशेष म्हणजे यंदा ‘क्रॉस द लाईन’ पार करणाऱ्या धावपटूंना रंगीत असे आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.

ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणारवैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात सहभागी होऊ इच्छिणारेही ऑनलाईन सहभाग निश्चित करू शकतात. ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार आहे.सहा लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके३, ५, १० आणि २१ कि.मी. मॅरेथॉन पूर्ण करणाºया सर्व धावपटूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. १० व २१ कि.मी. शर्यतीतील धावपटृूंना टायमिंग सर्टिफिकेटस्ही प्रदान करण्यात येणार आहेत.अधिक माहितीसाठी९९२२२०००६३,९८८१७४९३९०,९९२२९१५०३५,९८२२४०६५६२या क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन