शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वैद्यकीय शिक्षणाचा खेळखंडोबा

By admin | Published: February 03, 2016 2:59 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.

राज्यात वैद्यकीय शिक्षकांची ४३४ पदे रिक्तसुमेध वाघमारे नागपूरशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत तोकड्या संख्येतील प्राध्यापक शिकविण्याचे आव्हान पेलत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या ५६, सहयोगी प्राध्यापकांच्या १५३ तर सहायक प्राध्यापकांच्या २२५ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे वैद्यकीय शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी तयार झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) खरंच गरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते काय, हा प्रश्न आज निर्माण झाला आहे. या रुग्णालयासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा शोध घ्यावा, अशी परिस्थिती आहे. रुग्णालयात सलाईन नाही, ते विकत आणले तर लावण्यासाठी इंजेक्शन नाहीत. अपघातामधील जखमींना कित्येक तास उपचार मिळत नाहीत. औषधांचा खर्च रु ग्णाच्या नातेवाईकांनाच करावा लागतो. एक्स-रे बंदच असतात, सिटीस्कॅन यंत्रणा आहे तर त्याला लागणारी फिल्म नाही. त्यामुळे तातडीचे आॅपरेशन करण्यात वेळ जातो. सफाई कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येमुळे स्वच्छतागृहे कुलपबंद आहेत. यात वरिष्ठ डॉक्टरांची अपुरी संख्या भरच टाकत आहे. राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३८२ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. यातील ५६ पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या ९६८ पदांना मंजुरी प्राप्त असताना १५३ पदे भरण्यातच आलेली नाहीत, तर सहायक प्राध्यापकांची १,४७८ पदांमधून १,२५३ पदे भरण्यात आली आहेत. २२५ पदे आजही रिक्त आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, लोक मिळत नसल्याचे कारण देऊन शासनातर्फे अनेक पदे रिक्त ठेवली जातात. या प्रकारामुळे जे प्राध्यापक कार्यरत आहेत त्यांच्या बढत्या थांबलेल्या आहेत. यातील अनेक जण निवृत्तीवर आले आहेत. रिक्त जागा भरल्या जात नसल्याने इच्छुक असणाऱ्या प्राध्यापकांवरही अन्याय होत आहे. (प्रतिनिधी)