नागपूर : नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी ऑन द स्पॉट ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांनी काल रविवारी कोरोनासंदर्भात बैठक घेतली होती. त्यात नागपुरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी काही सूचनाही केल्या होत्या. नागपूर शहरातील धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमाननगर या उच्चभ्रू वस्तींमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असेल तर त्याचे नेमके कारण काय आहे? याचा शोध घेऊन या ठिकाणी ॲन्टिजेन टेस्टसारख्या पर्यायातून चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून, गर्दीच्या ठिकाणी ऑन द स्पॉट ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येईल. तसेच शहरातील हॉटस्पॉट झालेल्या भागावर विशेष लक्षसुद्धा ठेवण्यात येणार आहे.