आॅनलाईन लोकमतनागपूर : सतरा हजारांच्या देण्याघेण्यावरून निर्माण झालेल्या वादात तिघांनी एका व्यापाऱ्याच्या तोंडावर विशिष्ट पदार्थ असलेला स्प्रे मारला आणि त्याच्याजवळचा मोबाईल हिसकावून नेला. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली.राजेश नीळकंठ साठे यांचे धंतोलीच्या मेहाडिया चौकातील गणेश चेंबरमध्ये कार्यालय आहे. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास तेथे आरोपी राजेश गोविंद तेलानी (वय ५३), राहुल राजेश तेलानी (वय २९, दोघेही रा. जरीपटका) आणि राहुल रवींद्र सोनटक्के (वय २१, रा. लालगंज) हे तिघे गेले. तेलानीकडून साठेंनी काही दिवसांपूर्वी ८२ हजारांत एक मशिन विकत घेतली होती. त्यावेळी साठेंनी ६५ हजार रुपये दिले. उर्वरित १७ हजार रुपये बिल दिल्यानंतर देईल, असे सांगितले. ही रक्कम वसूल करण्यासाठी उपरोक्त आरोपी साठेंच्या कार्यालयात गेले. बिल देण्या-घेण्याच्या मुद्यावरून यावेळी त्यांच्यात वाद झाला. साठे १७ हजार रुपये देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे आरोपींनी त्यांच्याजवळचा स्प्रे काढून साठेंच्या तोंडावर मारला. विशिष्ट रसायन डोळ्यात गेल्यामुळे साठे हतबल झाले. ती संधी साधून आरोपींनी त्यांच्याजवळचा महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला. साठेंनी या प्रकाराची तक्रार धंतोली ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक केली.
नागपुरात व्यापाऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारून मोबाईल हिसकावून नेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 9:03 PM
सतरा हजारांच्या देण्याघेण्यावरून निर्माण झालेल्या वादात तिघांनी एका व्यापाऱ्याच्या तोंडावर विशिष्ट पदार्थ असलेला स्प्रे मारला आणि त्याच्याजवळचा मोबाईल हिसकावून नेला.
ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा व्यापाऱ्याशी वाद तिघांना अटक