लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका महिला डॉक्टरच्या वडिलोपार्जित भूखंडाचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याची दीड कोटी रुपयात विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुन्हा दाखल केला. छगनलाल कुंवरजीभाई पटेल (वय ५७) आणि सौरभ जुगलकिशोर अग्रवाल अशी आरोपींची नावे आहेत.अंबाझरीतील रहिवासी डॉ. राजश्री रामलाल चौधरी यांचा एक वडिलोपार्जित भूखंड आहे. त्याची किंमत कोट्यवधीत आहे. या भूखंडाचे बनावट आममुख्त्यारपत्र आरोपी छगनलाल पटेल याने तयार केले. त्याआधारे हा भूखंड एक कोटी ४५ लाख रुपयात विकत असल्याचा करारनामा आणि विक्रीपत्र करून ६ एप्रिल २०१७ ला भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे येताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी चौकशी केली असता फसवणूक केल्याचे उघड झाल्याने पटेल आणि अग्रवालविरुद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.ग्वालबन्सीचे पाप उजेडातदरम्यान, कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या नातेवाईक तसेच गुंड साथीदारांच्या पापाची पुन्हा काही प्रकरणे उघड झाली असून, लवकरच या प्रकरणात गुन्हे दाखल होणार आहेत.
दीड कोटींच्या भूखंडाची बनवाबनवी
By admin | Published: May 26, 2017 2:51 AM