नागपूर: राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका जवानाने आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान मिळाले तर दोघांना दृष्टी मिळणार आहे.
झेंडा चौक जयताळा येथील रहिवासी आशिष मडावी (२०) असे त्या अवयवदात्याचे नाव. त्याचे वडील रामभाऊ हे ‘एसआरपीएफ’मध्ये आहेत. पत्नी, एक मुलगी असे छोटे कुटुंब आहे. प्राप्त माहितीनुसार, आशिष हा ‘आयटीआय’चा प्रथम वर्षाला होताा. ६ एप्रिल रोजी कॉलेजमधून घरी जात असताना त्याची दुचाकी घसरली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एका अनोळखी व्यक्तीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल के ले. तिथे आठ दिवस उपचारानंतर त्याला मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले.
मात्र रुग्णाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. ‘ब्रेन डड’ म्हणजे मेंदू मृत लक्षणे आढळून आल्यावर न्यूरो सर्जन डॉ. कमलेश काल्बगवार, डॉ. सोमा चाम, डॉ. मेधा संगावार, डॉ. कमलेश मेश्राम, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. प्रसेंजीत ढवळे यांनी तपासणी करून ‘ब्रेन डेड’ घोषीत केले. डॉ. कल्बगवार, डॉ.चाम, भाग्यश्री निघोड व समाजसेवा अधीक्षक श्याम पांजला यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदान करण्यासाठी समुपदेशन केले. मुलाच्या अचानक मृत्यूने आईला मानसिक धक्का बसला. डोंगरा एवढ्या दु:खातही त्याचे वडील रामभाऊ यांनी अवयवदान करून मुलाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. बधिरिकरणशास्त्र विभागाच्या डॉक्टरांच्या चमूने विविध चाचण्या करून रुग्णांस स्थिर ठेवण्यासाठी रात्रभर विशेष प्रयत्न केले.
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय तपासण्या, रुग्णवाहिका व इतर व्यवस्थापन करण्यात आले. यावेळी डॉ. सुमित चाहकर यांनी समनव्य घडवून आणले. झोनल ट्रान्सप्लांट सेंटरने (झेडटीसीसी) प्रतिक्षा यादीनुसार अवयवाचे दान केले. यातील एक किडनी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका रुग्णाला तर दुसरी किडनी व यकृत खासगी हॉस्पिटलमधील रुग्णाला दान करण्यात आली. कॉर्निआ मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला दान करण्यात आले.
-हृदय व फुफ्फुस चैन्नईला जाणार होते‘झेडटीसीसी’ने हृद्य व फु फ्फुसाचे दान करण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांना ‘अलर्ट’ दिला होता. चैन्नईमधील एका हॉस्पिटलने या दोन्ही अवयवासाठी पुढाकारही घेतला. परंतु वेळेत विशेष विमान सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. यामुळे हृदय व फुफ्फुसाचे अवयवदान होऊ शकले नसल्याची माहिती आहे.