लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य राखीव दलाचा जवान प्रसन्ना मस्के (वय २६) याने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. रिझर्व बँक परिसरातील जवानांच्या चेंजिंग रूममध्ये शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.एमआयडीसीतील वैशालीनगरात राहणारा मस्के राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक चारचा जवान होता. त्याची गेल्या काही दिवसांपासून रिझर्व बँकेतील सुरक्षा व्यवस्थेत ड्युटी लागली होती. रात्री ९.३०च्या सुमारास त्याची ड्युटी संपली. रात्रपाळीतील सहकारी आल्यामुळे तो कपडे बदलविण्यासाठी बाजुच्या चेंजिंग रूममध्ये गेला. यावेळी आजुबाजुला त्याचे सहकारी जवान होते. अचानक बंदुकीतून गोळी चालल्याचा आवाज आल्याने सर्वांनी चेंजिंग रूमकडे धाव घेतली.सर्वत्र खळबळमस्के रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली. वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. सदर पोलिसांनाही कळविण्यात आले. रिझर्व बँक परिसरात ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणेत धावपळ निर्माण झाली. सदरचे ठाणेदार महेश बनसोडे आपल्या ताफ्यासह लगेच घटनास्थळी पोहचले. त्यांनी मस्केचा मृतदेह मेयोत पाठविला. वृत्त लिहिस्तोवर मस्केच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, घरगुती कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
नागपुरातील रिझर्व बँकेत एसआरपीएफ जवानाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:27 AM
राज्य राखीव दलाचा जवान प्रसन्ना मस्के (वय २६) याने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. रिझर्व बँक परिसरातील जवानांच्या चेंजिंग रूममध्ये शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
ठळक मुद्देस्वत:लाच घातली गोळी : चेंजिंग रूममध्ये थरार