१) परराज्यात जाणाऱ्या बसेस
-नागपूर-हैदराबाद
-नागपूर-आदिलाबाद
-नागपूर-इंदूर
-नागपूर-सिवनी
-नागपूर-छिंदवाडा
-नागपूर-बालाघाट
-नागपूर-बेरडी
-नागपूर-पचमढी
-नागपूर-खमारपाणी
-नागपूर-मोहगाव
-नागपूर-पिपळा
-नागपूर-छत्तीसगड
छिंदवाडाच्या गाड्या फुल्ल
छिंदवाडा मार्गावरील गाड्या सर्वात जास्त फुल्ल धावत आहेत. नागपूर आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणात प्रवासी छिंदवाडाला जातात. तसेच छिंदवाडातून मोठ्या संख्येने प्रवासी नागपुरात उपचारासाठी आणि इतर कारणासाठी येतात. त्यामुळे सध्या छिंडवाडा मार्गावरील बसेस पूर्ण क्षमतेने धावत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एसटीच्या चालक-वाहकांचे लसीकरण पूर्ण
एसटीच्या गणेशपेठ आगारातील बहुतांश चालक-वाहकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. सध्या १४५ चालक आणि १०५ वाहकांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.
कुठल्याच राज्यात लसीकरणाची सक्ती नाही
‘कोरोनामुळे सुरुवातीला मध्य प्रदेशातील वाहतूक बंद होती. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बसेस पूर्ववत सुरू झाल्या आहेत. लसीकरणाची अटही कोणत्याच राज्यात जाण्यासाठी नाही.’
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक गणेशपेठ आगार
...........