शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

स्टार बस चालकाची गुंडगिरी

By admin | Published: November 13, 2014 12:54 AM

अनियंत्रित व भरधाव वेगाने गाडी चालवण्याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून एका स्टार बस चालकाने शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांना अश्लील शिवीगाळ करून

विधानसभा चौकातील घटना : सामाजिक कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांना मारहाण नागपूर : अनियंत्रित व भरधाव वेगाने गाडी चालवण्याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून एका स्टार बस चालकाने शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांना अश्लील शिवीगाळ करून भर चौकात मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार विधानसभा चौकात मंगळवारी घडला. या घटनेवरून स्टार बस चालकांची गुंडगिरी किती वाढली आहे, हे स्पष्ट झाले आहे. छाया खोब्रागडे या मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास धर्मादाय आयुक्त कार्यालयातून आपले काम आटोपून माया उके यांच्यासह आपल्या स्कुटीने (एमच-३१ बीव्ही ५३३३) संविधान चौकाकडे जात होत्या. दरम्यान आकाशवाणी चौकात एमएच ३१-सीए-५२०३ क्रमांकाची स्टार बस ही भरधाव वेगाने त्यांच्या गाडीला अगदी लागून निघून गेली. अचानक घडलेल्या या घटनेने त्या घाबरून गेल्या. थोडाही स्पर्श झाला असता तरी त्यांना अपघात झाला असता. पुढे विधानभवन चौकात सिग्नलवर स्टार बस थांबताच छाया खोब्रागडे यांनी एका जागरूक नागरिकाप्रमाणे चालकाला इतक्या भरधाव वेगाने गाडी चालवण्याबाबत जाब विचारला. यावर आपल्या कृत्याची माफी मागण्याऐवजी स्टार बस चालक हुसैन अली (३९) रा. मोहपा हा खाली उतरला आणि छायाताई खोब्रागडे यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यांचे केस पकडून त्यांना खाली पाडले आणि मारहाण केली. छायाताई यांच्यासोबत असलेल्या माया उके यांनी मध्यस्ती केली असता त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत छाया खोब्रागडे यांच्या चेहऱ्याला व हाताला मार बसला. इतकेच नव्हे तर पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली असता, ‘पोलीस माझे काय बिघडवणार म्हणत तू कशाला मीच पोलिसांना बोलावतो’, अशी गुर्मीही दाखविली. भरदुपारी ही घटना घडली. यावेळी पाहणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती. या संतापजनक घटनेनंतर स्वत:ला सावरून छाया खोब्रागडे यांनी काही कार्यकर्त्यांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि लगेच सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेल्या, अ‍ॅड. संजय खोब्रागडे, राजेश वालदे, अ‍ॅड. विजय बागडे, प्रवीण उके, राजू कापसे, विशाल हुमने, मिलिंद फुलझेले, राहुल दहिकर, अ‍ॅड नितनवरे, विजया बागडे, दीपांकर भगत, वंदना पेठकर आदी पोलीस ठाण्यात पोहोचले. (प्रतिनिधी)पोलिसांची भूमिकाही संशयास्पद तक्रारकर्त्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सोबत चार वकील व इतर कार्यकर्तेही होते. असे असतानाही पोलिसांनी त्यांना तब्बल ७ वाजेपर्यंत बसवून ठेवले. त्यानंतर त्यांच्या हाताला मार लागला असतानाही त्यांना तक्रार लिहायला सांगितली. मारहाण झाली असल्याची तक्रार केली असतानाही वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले नाही. तक्रारकर्त्यांनी मागणी केली, परंतु त्यांच्यासोबत एकही पोलीस पाठविला नाही. त्यामुळे त्यांना वैद्यकीय तपासणी करताना मेडिकलमध्ये खूप त्रास झाला. या सर्व प्रक्रिया पार पाडताना रात्रीचे ११.३० त्यांना पोलीस ठाण्यातच वाजले तरी पोलिसांनी केवळ तक्रार नोंदवून घेतली गुन्हा दाखल केला नाही. छाया खोब्रागडे व काही कार्यकर्ते बुधवारी पुन्हा पोलीस ठाण्यावर धडकले. त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली तेव्हा कुठे आरोपी चालाकाविरुद्ध कलम ३५४, ३२३़, ५०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एकूणच या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही आरोपीला वाचवणारी होती.