शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

स्टार बस घोटाळ्याची चौकशी

By admin | Published: May 14, 2016 2:59 AM

महापालिकेतील बहुचर्चित स्टार बस घोटाळ्याची अखेर चौकशी होणार आहे. या घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्य सरकारची हिरवी झेंडी मनपात खळबळनागपूर : महापालिकेतील बहुचर्चित स्टार बस घोटाळ्याची अखेर चौकशी होणार आहे. या घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संबंधीचे पत्र शासनातर्फे महापालिकेला प्राप्त झाले आहे. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी वेळोवेळी स्टार बस घोटाळ्याच्या विरोधात महापालिका सभागृहात आवाज उठवत चौकशीची मागणी केली होती. मात्र, महापालिका दखल घेत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली होती. ‘मिंस्टर क्लीन’ अशी इमेज असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कुणालाही पाठीशी न घालता चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार बस घोटाळ्याच्या चौकशीबाबत राज्य सरकारने ११ मे २०१६ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. चौकशीसाठी नेमण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त न्यायाधीशांना मानधन, सेवा, वाहन, वाहन भत्ता व इतर अनुषांगिक भत्ते देण्याबाबत काय तरतूद आहे, याचा स्वयंस्पष्ट अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. या पत्रावरून स्टार बस घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. नागपूर शहरात शहर बस सेवा संचालित करण्यासाठी वंश निमय इन्फ्रा प्रोजेक्ट व महापालिका यांच्यात २००७ मध्ये करार झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत महापालिकेला २७० बस दिल्या होत्या. यात राज्य सरकारचाही वाटा होता. या बस नव्याने निविदा न काढता वंश निमयला चालविण्यासाठी देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या धाडसाचे स्वागत पुढील वर्षी फेब्रुवारीत महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार बस घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे धाडस दाखविले याबद्दल त्यांचे स्वागत केले जात आहे. भाजपच्या काही नेत्यांना हा निर्णय रुचलेला नाही. मात्र, स्टार बस घोटाळ्याच्या चौकशीला हिरवी झेंडी देऊन आपण भ्रष्टाचाऱ्यांना साथ देणारे नाहीत, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी या निमित्ताने दिला आहे. नंदलाल कमिटीनंतर १५ वर्षांनी दुसरी चौकशी महापालिकेत भाजपची असताना २००१ मध्ये क्रीडा साहित्य घोटाळा झाला होता. त्यावेळी राज्य सरकारतर्फे सचिव नंदलाल यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. नंदलाल समितीने चौकशी केल्यानंतर १०१ नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व बऱ्याच नगरसेवकांना तुरुंगात जावे लागले होते. या चौकशीचे परिणाम २००२ च्या निवडणुकीत भाजपला भोगावे लागले होते. महापालिकेत सत्तांतर होत काँग्रेसची सत्ता आली होती. त्या चौकशीनंतर तब्बल १५ वर्षांनी आता महापालिकेत स्टार बस घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होणार आहे.